ETV Bharat / state

सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकरांच्या सुसाईड नोटचे गौडबंगाल, प्रकरण दाबण्याचा रायगड पोलिसांचा प्रयत्न?

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर हे मुंबई येथे एसआयडी विभागात गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी कणेरकर यांची रायगड येथे बदली करण्यात आली होती. मात्र या बदलीमुळे कणेरकर हे प्रचंड दडपणाखाली होते.

author img

By

Published : Aug 27, 2019, 8:35 AM IST

Updated : Aug 27, 2019, 2:18 PM IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकर

रायगड - मुंबईच्या एसआयडी विभागातून रायगडमध्ये बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही मोठ्या अधिकाऱ्याची नावे असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे जिल्हा पोलीसदेखील ही बाब दडवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस प्रशांत कणेरकर यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबीयांनाही मीडियाला भेटू देत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुसाईड नोट बाहेर आल्यास यात कोणत्या बड्या अधिकाऱ्याची नावे आहेत. हेही समोर येऊ शकते. यामुळे या बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न तर पोलीस करत नाहीत ना, असा संशय निर्माण झाला आहे. प्रशांत कणेरकर हे पोलीस प्रशासन व्यवस्थेचे बळी ठरले आहेत, हे मात्र नक्की. त्यामुळे कणेरकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकरांच्या सुसाईड नोटचे गौडबंगाल

वाचा - रायगड: आजाराला कंटाळून रुग्णाची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर हे मुंबई येथे एसआयडी विभागात गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी कणेरकर यांची रायगड येथे बदली करण्यात आली होती. मात्र या बदलीमुळे कणेरकर हे प्रचंड दडपणाखाली होते. कणेरकर यांना पोलीस ठाण्यातील कामाचा कोणताच अनुभव नव्हता. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कणेरकर यांना अर्ज शाखेत बदली दिली होती.

प्रशांत कणेरकर हे कामावर रुजू झाल्यानंतर पंधरा दिवस रजा टाकून दादर येथे आपल्या घरी गेले होते. कणेरकर यांनी आपल्या मित्राला परिस्थितीबाबत बोलून आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखविले होते. त्यावेळी मित्रानेही टोकाची भूमिका घेऊ नकोस, असे सूचित केले होते. कणेरकर हे मानसिक दडपणात असूनही पंधरा दिवस कुटूंबाबरोबर मौज मजेत घालवून 14 ऑगस्ट रोजी कामावर रुजू झाले. यानंतर 16 ऑगस्टला कणेरकर यांनी फॅनला लटकून आत्महत्या केली.

मानसिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्या कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कणेरकर यांनी मी आत्महत्या का करत आहे, याबाबत लिहिले असून छळ करणाऱ्या काही मोठ्या अधिकाऱ्याची नावेही लिहिली आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई फिरत आहे. कणेरकर यांनी आत्महत्या करून दहा दिवस उलटले आहेत. मात्र सुसाईड नोट देण्यास पोलीस लपवाछपवी करत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र बड्या अधिकाऱ्यांच्या छळवणुकीने नाहक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी कणेरकर यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आपल्याच सहकाऱ्याला न्याय मिळवून देण्यास जिल्हा पोलीस प्रशासन तपासात तत्परता दाखवेल का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Intro:
सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकरांच्या सुसाईड नोटचे गौडबंगाल

रायगड पोलीस कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे

प्रकरण दाबण्यासाठी रायगड पोलिसांची लपवाछपवी

प्रशांत कणेरकर यांनी मानसिक धडपणातून केली आत्महत्या

सुसाईड नोट मध्ये कोणत्या अधिकाऱ्याची नावे

रायगड : मुंबई येथून एसआयडी विभागातून रायगडमध्ये बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही मोठ्या अधिकाऱ्याची नावे लिहून ठेवली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस ही बाब दडवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याने मीडियाला सुसाईड नोट देण्यासही पोलीस लपवाछपवी करीत आहेत. प्रशांत कणेरकर यांच्या पत्नी व कुटूंबाला मीडियाला भेटण्यास पोलीस देत नसल्याने संशयाची सुई निर्माण झाली आहे. सुसाईड नोटचा मजकूर बाहेर आल्यास कोणत्या बड्या अधिकाऱ्याची नावे कणेरकर यांनी लिहिली आहेत हे बाहेर येऊ शकते. त्यामुळे या बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत का असा संशय निर्माण झाला आहे. प्रशांत कणेरकर हे पोलीस प्रशासन व्यवस्थेचे बळी ठरले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळे कणेरकर यांच्या कुटूंबाला न्याय मिळेल का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.Body:सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर हे मुंबई येथे एसआयडी विभागात गेली 15 ते 20 वर्ष कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी कणेरकर यांची रायगड येथे बदली करण्यात आली होती. मात्र या बदलीमुळे कणेरकर हे प्रचंड दडपणाखाली होते. कणेरकर यांना पोलीस ठाण्यातील कामाचा कोणताच अनुभव नव्हता. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कणेरकर यांना अर्ज शाखेत बदली दिली होती.

प्रशांत कणेरकर हे कामावर रुजू झाल्यानंतर पंधरा दिवस रजा टाकून दादर येथे आपल्या घरी गेले होते. कणेरकर यांनी आपल्या मित्राला परिस्थितीबाबत बोलून आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखविले होते. त्यावेळी मित्रानेही टोकाची भूमिका घेऊ नकोस असे सूचित केले होते. कणेरकर हे मानसिक धडपणात असूनही पंधरा दिवस कुटूंबाबरोबर मौज मजेत घालवून 14 ऑगस्ट रोजी कामावर रुजू झाले. 16 ऑगस्ट रोजी कणेरकर यांनी फॅनला लटकून आत्महत्या केली.Conclusion:मानसिक तणावाखाली असलेल्या कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कणेरकर यांनी मी आत्महत्या का करतो याबाबत लिहिले असून छळ करणाऱ्या काही मोठ्या अधिकाऱ्याची नावेही लिहिली आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यावर संशयाची सुई फिरत आहे. कणेरकर यांनी आत्महत्या करून दहा दिवस उलटले आहेत. मात्र सुसाईड नोट देण्यास पोलीस लपवाछपवी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र बड्या अधिकाऱ्याच्या छळवणुकी मुळे नाहक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी कणेरकर यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आपल्याच सहकार्याला न्याय मिळवून देण्यास जिल्हा पोलिस प्रशासन तपासात तत्परता दाखवेल का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

--------------------------

प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सुसाईड नोट मध्ये काही जणांची नावे आहेत. कणेरकर यांच्या कुटूंबाला सुसाईड नोट दाखवण्यात येणार आहे. सध्या सुसाईड नोट देता येणार नसून याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

अनिल पारस्कर, जिल्हा पोलिस अधीक्षक
Last Updated : Aug 27, 2019, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.