रायगड - जिल्ह्यात आज 67 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रायगडमध्ये आतापर्यत 1 हजार 117 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 616 जणांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत 451 जणांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 50 वर पोहोचली आहे.
आज दिवसभरात 27 जणांनी कोरोनावर मात केली असून या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई तसेच उपनगर आणि पुणे या शहरांतून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज जिल्ह्यात पनवेल महापालिका 30, पनवेल ग्रामीण 10, उरण 03, कर्जत 01, अलिबाग 01, मुरुड 04, माणगाव 02, तळा 04, रोहा 01, म्हसळा 10, महाड 01 असे एकूण 67 नवीन रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यत जिल्ह्यातील 3 हजार 802 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी 2 हजाार 566 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 119 जणांचे रिपार्ट येणे बाकी आहे. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.