ETV Bharat / state

Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Sharad Pawar

Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Sharad Pawar On Maratha reservation
Sharad Pawar On Maratha reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 6:47 PM IST

Updated : Oct 27, 2023, 6:57 PM IST

रायगड Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. आश्वासन पाळता येत नसतील तर आश्वासनं देऊ नयेत असं टीकास्त्र शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सोडलंय.

आश्वासनं पाळता येत, नसतील तर देऊ नये : "मनोज जरांगे यांना दिलेल्या वेळेत सरकार आरक्षणाचा निर्णय घेईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण झाल्याचं दिसत नाही. त्यामुळं आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलंय. अंदोलकांनी सरकारला वेळ दिली होती. त्यामुळं आता उपोषणकर्त्यांना दोष देता येणार नाही, असं शरद पावारांनी सांगितलं.

आरक्षण देण्यात अपयश : मराठ्यांना आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यावरुन शरद पवारांनी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाना साधलाय. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी सरकारनं त्यांना वेळ मागितला होता. मात्र, 30 दिवसाच्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयश आलं आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं जरांगेंच्या समर्थकांशी संवाद साधला होता. त्यांच्यात काय संभाषण झालं याची मला कल्पना नाही. परंतु असं दिसतं की, त्यांना ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. नंतर पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली. - शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

पुन्हा एकदा उपोषणाला सुरवात : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यापूर्वी 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसले होते. मात्र, 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. सरकारनं त्यांच्या मागण्यांकडं लक्ष देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी 17 व्या दिवशी आंदोलन मागं घेतलं होतं. जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 30 दिवसांची मुदत दिली होती, ती २४ ऑक्टोबरला संपलीय. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी बुधवारपासून उपोषणाला सुरवात केलीय.

हेही वाचा -

  1. Mangesh Sable On Gunaratna Sadavarte :..अन्यथा ॲड. गुणरत्न सदावर्तेंना गंभीर परिणाम भोगावले लागतील; मंगेश साबळेंचा इशारा
  2. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा; म्हणाले, विरोध केला तर....
  3. Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांचं साईबाबांना साकडं; सरकारला सदबुद्धी द्यावी...

Last Updated : Oct 27, 2023, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.