ETV Bharat / state

कोरोनाचा असाही फटका... लॉकडाऊनमुळे लग्नाळू जोडप्याची स्वप्नं तूर्तास भंग

एप्रिल-मे महिन्यामध्ये शाळांना सुट्या असल्याने याच काळात प्रामुख्याने विवाहाचे मुहूर्त काढले जातात. यावेळी मात्र, कोरोनामुळे लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, जावळ या सोहळ्याचे कार्यक्रम रखडले गेले असून भटजी, बँडवाले, मंडप, केटरिंग व्यवसायिकांनाही याचा फटका बसला आहे.

Representative photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Apr 15, 2020, 10:25 AM IST

रायगड - एप्रिल-मे महिना सुरू झाला की, सगळीकडे लग्नांचा धुमधडाका बघायला मिळतो. साखरपुडा, हळद, लग्न सोहळ्याची गाणी कानावर पडतात. मात्र, यावेळी विवाहाचे मुहूर्त कोरोनाने टळले आहेत. यामुळे सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या अनेक लग्नाळू जोडप्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. कोरोनामुळे लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, जावळ या सोहळ्याचे कार्यक्रम रखडले गेले असून भटजी, बँडवाले, मंडप, केटरिंग व्यवसायिकांनाही याचा फटका बसला आहे.

एप्रिल-मे महिन्यामध्ये शाळांना सुट्या असल्याने याच काळात प्रामुख्याने विवाहाचे मुहूर्त काढले जातात. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणारे नातेवाईकही लग्न सोहळ्याला हजर राहतात. तसेच घरभरणी, वास्तू प्रवेश, जावळ हे कार्यक्रमही याच सुट्यामध्ये असतात. मात्र, यावेळी कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने लग्नाच्या मुहूर्तांना ग्रहण लावले आहे.

अनेकांची लग्नं ही आधीच ठरवून मुहूर्तही काढला गेला होता. काहींच्या लग्नाची निमंत्रणही वाटली गेली आहेत. मात्र, कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश निघाले आहेत. अनेकांनी आपले लग्न दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकले आहेत. कोरोनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयही बंद असल्याने रजिस्टर्ड होणारी लग्नेही बंद आहेत. कोरोनामुळे विवाह सोहळे रद्द झाल्याचा आर्थिक फटका हा वरवधू पित्यासह, भटजी, मंडप, बँडवाले, केटरर्स, घोडागाडी या व्यावसायिकांनाही बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.