रायगड - ट्रॅक्टर ट्रॉलीला एसटी बस धडक दिल्याने ७ प्रवाशांसह एसटी बस चालकासह वाहक जखमी झाले आहेत. आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील पळी येथे हा अपघात झाला. बस मुंबईहून अलिबागकडे जात असताना हा अपघात घडला.
रात्री दहाच्या सुमारास मुंबईतून आराम बस (एमएच 20/ बी.एल. 3229) अलिबागकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चरी ते पळी दरम्यान बस आली असता समोरून येणाऱ्या वाहनांची हेडलाईट डोळ्यावर एसटी चालका्च्या डोळ्यावर आली. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला विटांनी भरलेली ट्रॅक्टरच्या ट्रॉली (एमएच 06/एएच 9937) एसटीने जोरदार धडक दिली. यामध्ये ७ प्रवाशांसह एसटी चालक आणि वाहकही जखमी झाले आहेत. यामध्ये प्रवासी प्रदीप घरत (58) याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
प्रदीप घरत यांच्या दोन्ही पायाला, तोंडाला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. इतर जखमी प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून ५ जखमी प्रवाशांना मदत दिली असून, दोन जणांनी मदत नाकारली आहे.
जखमींची नावे
प्रदीप घरत (58), सचेंद्र गावंड (26), महेश कवळे (54), अजय महाडिक (32), संतोष मोकल (30), विजय लोखंडे (48), राजेंद्र सुपे (35) हे प्रवासी तर मुंढे (चालक), तानाजी राठोड (वाहक) हे एसटी चे कर्मचारी जखमी झाले आहेत.