ETV Bharat / state

अलिबागच्या मूर्तीकाराने बनवल्या कागदाच्या गणेशमूर्ती; मात्र, कोरोनामुळे व्यवसायाला फटका - Alibag Ganesh idol News

अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेल्या 17 वर्षांपासून कागदाच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुणे येथून आलेली मागणी रद्द झाली आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

Paper Ganesh Idol
कागदी गणेशमूर्ती
author img

By

Published : Aug 7, 2020, 1:59 PM IST

रायगड - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. शासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करण्याच्या भाविकांना सूचना केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेल्या 17 वर्षांपासून कागदाच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुणे येथून आलेली मागणी रद्द झाली आहेत. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

अलिबागच्या मूर्तीकाराने बनवल्या कागदाच्या गणेशमूर्ती

पूर्वी गणेशाच्या मूर्ती शाडू मातीपासून बनवल्या जात. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्तींना मागणी वाढू लागली. मात्र, केंद्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणल्याने पुन्हा शाडूमाती आणि इतर पर्यावरण पूरक वस्तूंपासून गणेश मूर्ती बनवण्यास प्राधान्य मिळत आहे. सागाव येथील संतोष थळे यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद आहे. 2003 पासून त्यांनी कागदापासून शोपीस, पपेट बनवण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना सूचली. गणपतीच्या साच्यामध्ये कागदाला खळ लावून कागद बसवून गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर या मूर्तींना पर्यावरणपूरक जलरंग देऊन रंगरंगोटी केली जाते.

कागदापासून बनवलेल्या सुबक आणि आकर्षक मूर्तींची हजार रुपये फुटाप्रमाणे थळे विक्री करतात. यावर्षी मुंबई-पुणे येथूनही शेकडो मूर्तींची ऑर्डर थळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गणपतीच्या मूर्तीही बनवल्या. मात्र, कोरोना संकट असल्यामुळे थळे यांना मिळालेल्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत. त्यामुळे बनवलेल्या गणेश मूर्ती विकायच्या कसा? हा एक प्रश्न त्याच्यांसमोर उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कोरोनामुळे अद्याप गणेश मूर्ती पोहचलेल्या नाहीत. यावर्षी कोरोनामुळे कमी पाण्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा सूचान शासनाने दिल्या आहेत. संतोष थळे यांनी कागदापासून बनवलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणपूरक भाविकांकडे या मूर्तींची स्थापना करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.