ETV Bharat / state

अलिबागकरांचे स्वप्न 'धक्क्याला'! मांडवा येथील रोरो बोट सेवा गाळात रुतणार - alibag

जेट्टीचे काम पूर्ण होऊनही अद्यापही रोरो बोटसेवा सुरू झालेली नाही. तसेच रोरो बोट ज्या ठिकाणी लागणार आहे. त्याठिकाणचा गाळ हा दरवर्षी काढण्यात येणार आहे. मात्र, गाळ काढला गेला असला तरी ओहोटीच्या काळात रोरो बोट धक्क्याला लागताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अलिबागकरांचे स्वप्न 'धक्क्याला'!
author img

By

Published : May 11, 2019, 2:23 PM IST

रायगड - मांडवा ते भाऊचा धक्का या जलमार्गावर सुरू होणारी रोरो बोटसेवेला मुहूर्त मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवाय या रोरो बोट ज्या धक्क्याला लागणार आहे ती जागाही गाळाने माखली आहे. येथील गाळ काढलेला असतानाही रोरो बोट धक्क्याला लागताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्चूनही अलिबागकरांचे रोरो बोटसेवेचे स्वप्नेदखील विरणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मांडवा ते गेटवेमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी जलवाहतूक सेवा सुरू आहे. त्यामुळे मुंबईहून लाखो पर्यटक जलमार्ग अलिबागकडे पर्यटनास येत असतात. जलप्रवास हा स्वस्तात, आरामदायी व सुखकारक असल्याने पर्यटक समुद्राचा आनंद घेत प्रवास करीत असतात. त्यामुळे आगामी काळात भाऊचा धक्का ते मांडवा, असा जलप्रवास रोरो बोटसेवेमार्फत करण्याचा शासनाचा मानस आहे. या रोरो बोटसेवेमध्ये प्रवासी हे आपली वाहनेदेखील घेऊन येऊ शकतात. त्यामुळे रोरो बोटसेवा सुरू झाल्यास पर्यटकांचा ओघ आणखी वाढणार आहे.

मांडवा येथे अद्यावत जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी जेट्टी, प्रवाशाना थांबण्यासाठी सुविधा, पार्किंग सुविधा केलेली आहे. यासाठी करोडो रुपये खर्च करून जेट्टी तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भरतीचे पाणी अडवण्यासाठी रॉकचे बांधकामही करण्यात आलेले आहे. मात्र, जेट्टीचे काम पूर्ण होऊनही अद्यापही रोरो बोटसेवा सुरू झालेली नाही. तसेच रोरो बोट ज्या ठिकाणी लागणार आहे. त्याठिकाणचा गाळ हा दरवर्षी काढण्यात येणार आहे. मात्र, गाळ काढला गेला असला तरी ओहोटीच्या काळात रोरो बोट धक्क्याला लागताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जलप्रवासी करणाऱ्या बोटी लागताना याठिकाणी समुद्राचा तळ बोटीला लागत आहे. त्यामुळे रोरो सारखी मोठी बोट लागताना कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे रोरो बोट सेवा मांडवा बंदराला लागणार की नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Intro:मांडवा येथील रोरो बोट सेवा गाळात रुतणार

रोरो बोट धक्क्याला लागताना येणार अडचण

रोरो बोट सेवेचे स्वप्न कधी पूर्ण होणार

रायगड : मांडवा ते भाऊचा धक्का या जलमार्गावर सुरू होणारी रोरो बोटसेवा सुरू होण्याची चिन्ह दिसत नसून रोरो बोट लागणारी जागा ही गाळात रुतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील गाळ काढलेला असतानाही रोरो बोट धक्क्याला लागताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून रोरो बोटसेवा गाळात रुतली असून अलिबागकरांचे रोरो बोटसेवेचे स्वप्न हे विरणार हे नक्की

Body:मांडवा ते गेटवेमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी जलवाहतूक सेवा सुरू आहे. त्यामुळे मुंबईहून लाखो पर्यटक जलमार्ग अलिबागकडे पर्यटनास येत असतात. जलप्रवास हा स्वस्तात, आरामदायी व सुखकारक असल्याने पर्यटक समुद्राचा आनंद घेत प्रवास करीत असतात. त्यामुळे आगामी काळात भाऊचा धक्का ते मांडवा असा जलप्रवास रोरो बोटसेवेमार्फत करण्याचा मानस शासनाचा आहे. या रोरो बोटसेवेमध्ये प्रवाशी हे आपली वाहने घेऊन येऊ शकतात. त्यामुळे रोरो बोटसेवा सुरू झाल्यास पर्यटकांचा ओघ अजून वाढणार आहे.

मांडवा येथे अद्यावत जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी जेट्टी, प्रवाशाना थांबण्यासाठी सुविधा, पार्किंग सुविधा केलेली आहे. यासाठी करोडो रुपये खर्च करून जेट्टी तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भरतीचे पाणी अडवण्यासाठी रॉकचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र जेट्टीचे काम पूर्ण होऊनही अद्यापही रोरो बोटसेवा सुरू झालेली नाही.

Conclusion:रोरो बोट ज्या ठिकाणी लागणार आहे. त्याठिकाणचा गाळ हा दरवर्षी काढण्यात येणार आहे. मात्र गाळ काढला गेला असला तरी ओहटीच्या काळात रोरो बोट धक्क्याला लागताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलप्रवासी करणाऱ्या बोटी लागताना याठिकाणी तळ बोटीला लागत आहे. त्यामुळे रोरो सारखी मोठी बोट लागताना कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे रोरो बोट सेवा मांडवा बंदराला लागणार की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.