रायगड - किल्ले रायगडावर रोपवेने पर्यटकांना वाहून नेणारी सेवा 24 ते 28 फेब्रुवारी असे पाच दिवस बंद राहणार आहे. तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद राहणार असल्याचे रोपवे प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र खातू यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचा - सीएए विरोधी आंदोलन LIVE : अलीगढमधील इंटरनेट सेवा स्थगित, जाफराबादमध्ये निदर्शने सुरूच..
किल्ले रायगडावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या किल्ल्यावर पायी किंवा रोपवेने जाता येते. मिलेनियम प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गडावर रोपवे सुविधा सुरू केली आहे. गडावर येणारे अनेक पर्यटक पायी चालण्याऐवजी रोपवेला प्राधान्य देत असतात. या मार्गाने १० ते १५ मिनिटात गडावर पोहोचता येते.