ETV Bharat / state

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून - संपर्क तुटला

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणीचे रस्ते गेले असुन, काही गावांचा संपर्क तुटला आहे.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:18 PM IST

रायगड - महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड सावरट संदोशीला जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. त्यामुळे संदोशी, सावरट, करमर, आमडोशी, कावळे-बावळे या 6 गावांचा रायगडशी संपर्क तुटला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून
तर, पोलादपूर तालुक्यातील कोतवाल व रेहेवाडी हा रस्ता खचल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शिवथरखल येथील रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने हा रस्ता बंद झालेला आहे.जिल्ह्यात बारा तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड, पोलादपूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पोलादपूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोतवाल व रेहेवाडी या गावाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टमध्ये खचला असून कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, रेळेवाडी व कोतवाल बौद्धवादी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. या गावांची लोकसंख्या 2500 च्या जवळपास आहे. पावसाची संततधार कमी न झाल्यास हा रस्ता आणखी खचला जाऊन परिसरातील 100 च्या आसपास झाडे जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे.

Intro:महाडमधील बांधणीचा माळ सावरट रस्ता गेला वाहून

पोलादपूरमधील कोतवाल रस्ता पूर्णतः गेला खचून

शिवथरखळ रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद

रायगड : महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड सावरट संदोशीला जाणारा रस्ता बांधणीचा माळ या घाट वळणावरचा रस्ता अतिवृष्टी मुळे वाहून गेला आहे. त्यामुळे संदोशी, सावरट, करमर, आमडोशी, कावळे-बावळे या 6 गावाचा किल्ले रायगडशी संपर्क तुटला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर पोलादपूर तालुक्यातील कोतवाल व रेहेवाडी हा रस्ता खचल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शिवथरखल येथील रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने हा रस्ता बंद झालेला आहे. Body:जिल्ह्यात बारा तासात मुसळधार अतिवृष्टी झाली आहे- या अतिवृष्टीने जिल्ह्यत हाहाकार माजला आहे. महाड पोलादपूर तालुक्यात पुरासह नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. महाड तालुक्यातील पाचाड सावरटला जाणारा रस्ता अतिवृष्टीने वाहून खोल दरीत गेला आहे. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. Conclusion:पोलादपूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोतवाल व रेहेवाडी या गावाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टमध्ये खचला असून कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, रेळेवाडी व कोतवाल बौद्धवादी या गावातील संपर्क पूर्णता तुटला असून या गावाची लोकसंख्या 2500 च्या जवळपास आहे. या चार गावांचा जाण्या येण्याचा हा मार्ग पुर्णपणे बंद झाला आहे. पावसाची संततधार कमी न आल्यास हा रस्ता आणखी खचला जाऊन परिसरातील 100 च्या आसपास झाडे जमिदोस्त होण्याची भीती आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.