ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष - रायगड जिल्हा परिषद

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप विरोधी बाकावर बसले आहेत. शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजप 3 असे 59 चे बलाबल जिल्हा परिषदेमध्ये आहे.

रायगड जिल्हा परिषद
author img

By

Published : Nov 18, 2019, 4:15 PM IST

रायगड - जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी 19 नोव्हेबरला मंत्रालयात पार पडणार आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी इच्छुक डोळे लावून बसले आहेत. शेकापच्या सदस्या नीलिमा पाटील यांना अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र, आरक्षण खुला प्रवर्ग, ओबीसी सोडून एसटी अथवा इतर पडले तर अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप विरोधी बाकावर बसले आहेत. शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजप 3 असे 59 चे बलाबल जिल्हा परिषदेमध्ये आहे.

हेही वाचा - पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 सदस्य निवडून आले असताना अध्यक्षपद, शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण सभापतीपद शेकापने राष्ट्रवादीला दिले आहे. शेकापकडे उपाध्यक्ष, बांधकाम आणि अर्थ, समाजकल्याण आणि कृषी सभापती पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असून आता अध्यक्षपद शेकापकडे जाणार आहे.

राज्यातील सत्तेतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने रायगड जिल्हा परिषदेतील सत्तांतर होईल की तेच राहील हे आरक्षण सोडतीनंतरच समोर येणार आहे.

हेही वाचा - महाशिवआघाडी आली तरी पनवेल महापालिकेच्या चाव्या भाजपकडेच!

Intro:रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्ष पदाची माळ?

शेकापचा अध्यक्ष बसणार की सत्तांतर होणार

रायगड : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत उद्या 19 नोव्हेबर रोजी मंत्रालयात पार पडणार आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी इच्छुक डोळे लावून बसले आहेत. शेकापच्या सदस्य नीलिमा पाटील यांना अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. मात्र आरक्षण ओपन, ओबीसी सोडून एसटी अथवा इतर पडले तर अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज्यातील बदलत्या राजकारणाचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीत बदल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप विरोधी बाकावर बसले आहेत. शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजपा 3 असे 59 चे बलाबल जिल्हा परिषदेमध्ये आहे.

Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 सदस्य निवडून आले असताना अध्यक्षपद, शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण सभापतीपद शेकापने राष्ट्रवादीला दिले आहे. शेकापकडे उपाध्यक्ष, बांधकाम आणि अर्थ, समाजकल्याण आणि कृषी सभापती पद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असून आता अध्यक्षपद शेकापकडे जाणार आहे. Conclusion:शेकापमधून माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांचे नाव शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी आधीच निश्चित केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या आरक्षण सोडतीत ओपन अथवा ओबीसी आरक्षण रायगडसाठी पडले तर अध्यक्ष पदाची माळ नीलिमा पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे. मात्र आरक्षण बदलले तर अध्यक्ष पद शेकाप मधून दुसऱ्याच्या गळ्यात पडले जाईल.

मात्र राज्यातील सत्तेतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने रायगड जिल्हा परिषदेतील सत्तांतर होईल की तेच राहील हे आरक्षण सोडतीनंतर पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.