रायगड- जिल्ह्यात 9 ते 16 जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. रायगड जिल्हा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील दिलेला हवामान विभागाचा अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण नसून, उन्हाळी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे नक्की पाऊस पडणार की नाही, या संभ्रमात रायगडकर आहेत. अतिवृष्टीचा इशारा दिला असला, कारणाने एन डी आर एफ पथक ही दाखल झाले होते. मात्र सुदैवाने अतिवृष्टी अद्याप झालेली नाही.
![रेड अलर्ट घोषित; मात्र जिल्ह्यात उन्हाळी वातावरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-01-redalart-7203760_13062021092940_1306f_1623556780_813.jpg)
जिल्ह्यात रेड अलर्ट मात्र पावसाचा पत्ता नाही
रायगड जिल्ह्यात 13 ते 16 जून दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता पुन्हा हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड जिल्हा हा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊन पडले असून, पावसाची मध्येच हलकीशी सर येऊन जात आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित असल्याने प्रशासनाने ही सतर्क राहण्याचा इशारा यंत्रणांना दिला आहे. मात्र अतिवृष्टी सारखी पतिस्थिती जिल्ह्यात सध्या तरी दिसत नाही.
हेही वाचा- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 4 टीम दाखल