ETV Bharat / state

हा घ्या पुरावा.. आता बोला सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही ?

भारतातील अनेक विरोधी पक्ष ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागत होते तेव्हा त्यांना भाजप व मोदी देशद्रोही म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत होते.

राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
author img

By

Published : Apr 26, 2019, 3:32 PM IST

Updated : Apr 26, 2019, 4:01 PM IST

पनवेल (रायगड) - 'ए लाव रे तो व्हिडिओ', आणि 'आणा रे त्याला' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच झोप उडवली आहे. पनवेलमधील झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सादर केलेल्या अनेक पुराव्या पैकी एक पुरावा पाहून भाजपला धडकी भरली आहे. बालाकोट एअरस्ट्राईकवरून आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही पण आज मी तुम्हाला पुरावा देणार आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालाकोट हल्ल्यावर केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या वक्तव्याची ‘टाईम्स ऑफ इंडिया’ची बातमी दाखवत भाजपची पोलखोल केली.

राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर आरोप

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून किती दहशतवादी ठार झाले हे भारतीय सैन्य दलाल माहीत नव्हते आणि मग अमित शहाना कसे समजले? असा सवाल करून राज ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. भारतातील अनेक विरोधी पक्ष ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागत होते तेव्हा त्यांना भाजप व मोदी देशद्रोही म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत होते. पण पनवेलच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट बालाकोट हल्ल्यावर केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा देत भाजप आणि नरेंद्र मोदी यांना तोंडघशी पाडले आहे. यात सुषमा स्वराज यांनी स्वतः हल्ल्यात एकही पाकिस्तानी व्यक्ती ठार झाली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इतर विरोधकांप्रमाणे सुषमा स्वराज या देखील देशद्रोही आहेत का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.

पुलवामा हल्ल्यानंतरचे मोदी यांचे फोटो राज ठाकरेंनी सभेत दाखवले आणि लोकांना विचारले यापैकी कोणता चेहरा दुःखी वाटतो का? पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी एक पुरस्कार घ्यायला कोरियाला गेले, त्यांना काहीच कसे वाटत नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Intro:बातमीला व्हिडीओ एफटीपी करीत असताना प्रॉब्लेम येत आहे. व्हॉट्सऍप करत आहे.

पनवेल

'ए लाव रे तो व्हिडिओ', आणि 'आणा रे त्याला' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच झोप उडवली आहे. पनवेलमधील झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सादर केलेल्या अनेक पुराव्या पैकी एक पुरावा पाहून भाजपला धडकी भरली आहे. बालाकोट एअरस्ट्राईकवरून आम्ही पुरावे मागितले तर आम्ही देशद्रोही… पण आज मी तुम्हाला पुरावा देणार आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालाकोट हल्ल्यावर केंद्रिय मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या वक्तव्याची ‘टाईम्स ऑफ इंडिया’ची बातमी दाखवत भाजपची पोलखोल केली.Body:भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून किती दहशतवादी ठार झाले हे भारतीय सैन्य दलाल माहीत नव्हतं आणि मग अमित शहाना कसं समजलं? असा सवाल करून राज ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. भारतातील अनेक विरोधी पक्ष ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागत होते तेव्हा त्यांना भाजप व मोदी देशद्रोही म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत होते. पण पनवेलच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट बालाकोट हल्ल्यावर केंद्रिय मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा देत भाजप आणि नरेंद्र मोदी यांना तोंडघशी पाडले आहे. यात सुषमा स्वराज यांनी स्वतः हल्ल्यात एकही पाकिस्तानी व्यक्ती ठार झाली नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे इतर विरोधकांप्रमाणे सुषमा स्वराज या देखील देशद्रोही आहेत का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. Conclusion:पुलवामा हल्ल्यानंतरचे मोदी यांचे फोटो राज ठाकरेंनी सभेत दाखवले आणि लोकांना विचारलं यापैकी कोणता चेहरा दुःखी वाटतो का? पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी एक पुरस्कार घ्यायला कोरियाला गेले, त्यांना काहीच कसं वाटत नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
Last Updated : Apr 26, 2019, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.