ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध - जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापती पदाची निवडणूक

जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापती पदाची निवडणूक परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 सभापती पदे मिळाली.

Raigad Zilha parishad election
रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
author img

By

Published : Jan 16, 2020, 7:42 PM IST

Updated : Jan 23, 2020, 7:37 PM IST

रायगड - जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापती पदाची निवडणूक परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 सभापती पदे मिळाली.

शेकापचे दिलीप भोईर यांची समाजकल्याण, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांची महिला बालकल्याण सभापतीपदी तर अन्य 2 विषय समिती सभापतीपदी शेकापच्या अ‌ॅड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादीचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले. सभापती निवडीच्या वेळी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी अनुपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेतील महत्वाचे अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

विषय समिती सभापती पदाच्या आजच्या निवडीकडे शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने चारही सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकापच्या अ‌ॅड निलिमा पाटील या इच्छुक आहेत. मात्र, हे सभापतीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने याबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अर्थ व बांधकाम सभापती पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष लागले आहे.

Intro:रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

समाजकल्याण सभापती पदी दिलीप भोईर तर महिला बालकल्याण सभापती पदी गीता जाधव

शिवसेना, भाजप सदस्य अनुपस्थित

अर्थ व बांधकाम सभापती साठी दोन्ही पक्षात रस्सीखेच

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाची निवडणूक जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात पार पडली. विषय समिती सभापती निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन सभापती पदे मिळाली. शेकापचे दिलीप भोईर यांची समाजकल्याण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांची महिला बालकल्याण सभापती पदी तर अन्य दोन विषय समिती सभापती पदी शेकापच्या ऍड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले. सभापती निवडीच्या वेळी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी अनुपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेतील महत्वाचे अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Body:रायगड जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. शेकापकडून दिलीप भोईर यांनी समाजकल्याण सभापती पदासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. अन्य दोन विषय समिती पदासाठी शेकापच्या ऍड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन मनवे यांचीही अन्य कोणी अर्ज न भरल्याने बिनविरोध निवड झाली.

Conclusion:विषय समिती सभापती पदाच्या आजच्या निवडीकडे शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने चारही सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शेकापच्या ऍड नीलिमा पाटील ह्या इच्छुक आहेत. मात्र हे सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्याने याबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अर्थ व बांधकाम सभापती पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Last Updated : Jan 23, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.