रायगड - समस्त शिवप्रेमींचे श्रद्धास्थान, स्वराज्याची राजधानी आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या किल्ले रायगडावर जाणारा रोपवे आज पासुन पर्यटकांच्या सेवेत सुरु झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांदरम्यान रोपवे बंद करण्यात आला होता. त्यानंतर रोपवेच्या जागा मालकीवरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, शिवप्रेमी आणि पर्यटकांची सुविधा लक्षात घेवून न्यायालयाने रोपवे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
आठ महिन्यानंतर रोपवे सुरू, शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण-
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, गड, किल्ले यावर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली होती. आठ महिन्यांतर शासनाने पर्यटनास परवानगी दिली. गड, किल्ले पर्यटनास खुली करण्याचे शासनाचे आदेश आल्याने. जिल्हाधिकारी यांनी पर्यटनास जाण्यास परवानगी दिली आहे. शिवप्रेमीचे आणि पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेला रायगड किल्लाही खुला झाला आहे. मात्र गडावर जाणारा रोपवे हा स्थानिकांच्या जागेवरील वादामुळे पर्यटकांसाठी बंद होता. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. अखेर रायगड रोपवे सुरू करण्यास परवानगी दिल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी रायगड रोप वे सुरु होत असताना येथील स्थानिकांनी वादग्रस्त जागेत आपले व्यवसाय थाटले. त्यामुळे काही काळ रोपवे प्रशासन आणि स्थानिकामध्ये वाद निर्माण झाला. वादाचे प्रसंग निर्माण होणार असल्याने पोलिसांनी आधीच चोख बंदोबस्त ठेवला होता. महाड तालुका पोलिसांनी वाद निर्माण करणाऱ्या महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले. त्यानंतर रोपवे सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला.
कोरोनाचे नियम पाळून सुविधा-
फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षेच्या नियमांच पालन करीत प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड रोपवे आज पुन्हा पर्यटक आणि शिवप्रेमींच्या सेवेत रूजू झाला.
हेही वाचा- 'पदवीधरच्या निकालातून वाचाळवीरांना जबरदस्त चपराक'
हेही वाचा- सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीवर असे होतेय काम