ETV Bharat / state

रायगड जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची पूर्व तयारी पूर्ण

जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात २१७९ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ७ सखी केंद्र आणि १ दिव्यांग मतदान केंद्र आहे.

author img

By

Published : Apr 22, 2019, 12:37 PM IST

Updated : Apr 22, 2019, 3:28 PM IST

संग्रहीत छायाचित्र

रायगड - लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य वाटप करण्यासाठी जे.एस.एम कॉलेजमध्ये जिल्हा प्रधासनाकडून प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात २१७९ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ७ सखी केंद्र आणि १ दिव्यांग मतदान केंद्र आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस, केंद्रीय राखीव दल तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. दिव्यांग मतदारांसाठीही प्रशासनाकडून सुविधा केलेली आहे. तर, मतदान केंद्रावर रुग्णवाहिकांची देखील सोय करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना पोहचविण्यासाठी एसटी बस, खाजगी वाहनांची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सुविधाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Intro:
23 एप्रिलला रायगडात मतदान

जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची पूर्व प्रक्रिया तयारी पूर्ण

रायगड : 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य वाटप करण्यासाठी जे एस एम कॉलेजमध्ये जिल्हा प्रधासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात 23 एप्रिल ला मतदान होत असल्याने जिल्ह्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Body:23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होत असून त्यादृष्टीने मतदान केंद्रावर कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून सुरू केले आहे. मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी याना पोहचविण्यासाठी एसटी बस, खाजगी वाहनांची सुविधा प्रशासनाकडून केली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सुविधाही प्रशासनाकडून केली आहे.

Conclusion:जिल्ह्यात 16 लाख 51 हजार 510 मतदार आपला मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. जिल्ह्यात 2179 मतदान केंद्र असून यामध्ये 7 सखी केंद्र व 1 दिव्यांग मतदान केंद्र आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस, केंद्रीय राखीव दल तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. दिव्यांग मतदारांसाठीही प्रशासनाकडून सुविधा केलेली आहे. तर मतदान केंद्रावर रुग्णवाहिकाची सोय केलेली आहे.
Last Updated : Apr 22, 2019, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.