ETV Bharat / state

Raigad Irshalwadi Landslide : मुसळधार पावसामुळे एनडीआरएफचे इर्शाळवाडीतील बचाव कार्य सुरू; दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीमधील एनडीआरएफचे बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 27 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. तर आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

इर्शाळवाडीत बचाव कार्य करताना एनडीआरएफ कर्मचारी

author img

By

Published : Jul 21, 2023, 7:54 AM IST

Updated : Jul 21, 2023, 10:48 AM IST

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावातील अनेक घरे दरड कोसळल्याने दबली गेली आहेत. दुसऱ्या दिवशी बचाव पथकाचे काम सुरू आहे. आमच्या चार पथकांनी कालही शोधमोहीम राबवली होती. आज आम्ही भूस्खलनग्रस्त भागाचे झोनमध्ये विभाजन करू. स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे एनडीआरएफचे कमांडंट एसबी सिंग यांनी सांगितले.

साधारण 50 ते 60 घरांची वस्ती असलेले हे गाव होत्याचे नव्हते झाले. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय आपत्ती दलाने तेथील शोध आणि बचाव कार्य संध्याकाळी थांबवले आहे. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गावातील 17 घरे भुईसपाट झाली असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्यात दबलेल्यांपैकी 27 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे.

  • जिल्ह्यातील #खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. . यामध्ये 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. #landslide pic.twitter.com/bRGRFyjDVv

    — DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@InfoDivKonkan) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

17 घरे जमीनदोस्त : खालापूर तालुक्यांतर्गत डोंगर उतारावर वसलेल्या इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले. गावातील सुमारे 50 घरांपैकी 17 घरे जमीनदोस्त झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या डोंगरभागात मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली. घटना घडल्यानंतर एनडीआरएफचे पथक बचाव कार्य सुरू झाले. मदत कार्य करण्यासाठी बचाव पथकाला अनेक अडचणी येत होत्या. इर्शाळवाडीत जाण्यासाठी कोणताच पक्का रस्ता नाही आहे. एकेक डोंगर पार करून या गावात पोहोचता येते. त्यानंतर इर्शाळवाडीत जाण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. एनडीआरएफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवसभरात भूस्खलनाच्या ठिकाणावरून 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

  • #WATCH | Maharashtra: "Our four teams were carrying out the search operation yesterday as well and today we will divide the landslide-affected area into zones. With the help of local people, we will try to retrieve the body of the people. Various other agencies have joined us in… pic.twitter.com/VobzV7GSny

    — ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांची भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी इर्शाळवाडीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेथे बचाव कार्यात गुंतलेल्या जवानांशी चर्चा केली. दरम्यान इर्शाळवाडी हे भूस्खलन प्रवण गावांच्या यादीत नव्हते. ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेल्यांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे, असे त्यांनी घटनास्थळी पत्रकारांना सांगितले. नागरिकांच्या मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर सज्ज करण्यात आले होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांना उड्डाण करता आले नाही. सतत पाऊस होत असल्याने एनडीआरएफ जलदगतीने मदत कार्य करू शकले नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

इर्शाळवाडीची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार पीडितांच्या पाठीशी उभे आहे. सतत मुसळधार पाऊस पडत असून 15 ते 20 फुटांपर्यंत मलबा व ढिगारा साचला आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मदतकार्यात अडचणी : एनडीआरएफच्या दलाला बचाव कार्य करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. या गावात जाण्यासाठी कोणताच प्रकारचा रस्ता नाही. एक डोंगरपार करून इर्शाळवाडीमध्ये पोहोचता येते. यामुळे जड उपकरणे सहजपणे तेथे नेता आली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. खराब हवामानामुळे आणि अंधारामुळे एनडीआरएफच्या जवानांनी शोध आणि बचाव कार्य थांबवले. आज सकाळी परत बचाव कार्य सुरू केले जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात इर्शाळवाडीवर झाला घात; माळीणच्या घटनेची झाली आठवण
  2. Irshalwadi landslide Incident : इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्दैवी, मंत्री दीपक केसरकर

Last Updated : Jul 21, 2023, 10:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.