ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ पाणी टंचाईही झाली तीव्र; टँकरने पाणीपुरवठा सुरू - रायगड तीव्र पाणी टंचाई

दरवर्षी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या सुरू होते. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर,श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

water scarcity
पाणी टंचाई
author img

By

Published : May 27, 2020, 1:03 PM IST

रायगड - जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना पाणी टंचाईच्या समस्येनेही नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्याच्या बारा तालुक्यातील 331 गावे आणि वाड्यातील 62 हजार 479 नागरिक पाणी टंचाईच्या समस्येत होरपळत आहेत. या नागरिकांना सध्या 33 टँकर आणि 4 विहिरींमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ पाणी टंचाईही झाली तीव्र

दरवर्षी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी नऊ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर,श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच कोरोनामुळे अनेक चाकरमानी गावाकडे आले असल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होत असला तरी रोजच्या दैनंदिन कामासाठी पाण्याचा तुटवडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासाठी नागरिकांना अतिरिक्त पाणी विकत घ्यावे लागत आहे.

पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी पंधरा दिवस बाकी असून तोपर्यंत नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासन जरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असले तरी गावागावातील पाणी टंचाई समस्या सोडवण्यात पूर्णपणे यश आलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.