ETV Bharat / state

'त्रिसूत्रीचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊन नाही' - raigad lockdown news

सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा या शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर नेटाने करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

निधी चौधरी
निधी चौधरी
author img

By

Published : Dec 1, 2020, 4:09 PM IST

रायगड - दिल्ली, केरळ, राजस्थानमध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाची मोठी लाट आली नसली तरी नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन केल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

'त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करा'

सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा या शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर नेटाने करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. लग्नसराई हंगाम पुन्हा सुरू झाला असला तरी कमी नातेवाईकांच्या सोबतीने सोहळा पार पाडा, गर्दीची ठिकाणे टाळा जेणेकरून जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण रोखण्यास मदत मिळणार आहे.

'लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या'

जिल्ह्यात कोरोना सध्यातरी आटोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

'नियम पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन नाही'

शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमाचे पालन नागरिकांनी काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची लस तयार होत आहे. जोपर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत ही लस पोहोचत नाही, तोपर्यंत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.