ETV Bharat / state

नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हवामान खात्याने ७२ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 9:15 PM IST

नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रायगड - हवामान खात्याने ७२ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे. तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसात अतिवृष्टीचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रायगड परिसरात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. पुरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. तसेच खारघर पांडवकडा येथे ४ जण बुडाले आहेत. त्यामध्ये ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत.

जिल्ह्यातील धबधबे, समुद्र किनारी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. सखल भागात असलेल्या लॉज व हॉटेलवर आलेल्या पर्यटकांना आजच आपल्या स्थळी निघून जाण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून कुठे अडकण्याची शक्यता नाही. असे डॉ विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Intro:जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर

नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

धबधबे, समुद्र किनाऱ्यावर जाण्यास पर्यटकाना बंदी

रायगड : हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता 72 तासात वर्तवली असल्याने जिल्ह्यातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवसात कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जनतेला केले आहे. तर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तर शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.Body:शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर पुलही पाण्याखाली गेले आहेत. या पुरपरिस्थिमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. तर खारघर पांडवकडा येथे चार जण बुडाले असून एक मृतदेह सापडला आहे. तर तिघांचा शोध रेस्क्यू टीम कडून सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.Conclusion:जिल्ह्यातील धबधबे, समुद्र किनारी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. सखल भागात असलेल्या लॉजेस व रिसॉर्टवर आलेल्या पर्यटकांना आजच आपल्या स्थळी निघून जाण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून कुठे अडकण्याची शक्यता नाही. असे डॉ विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.