रायगड - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे गोडाऊनमधून गुटख्याचा लाखोंचा साठा जप्त करण्यात आला आहे. पालघरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत हा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रायगड पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 जानेवारीला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मात्र, पोलिसांनी माध्यमांना याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
हेही वाचा - अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतिणीचा सुळका, प्रजासत्ताक दिनी कामगिरी
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे शिवशंभो पेट्रोल पंपासमोर असलेल्या गोडाऊनमध्ये अनधिकृत गुटख्याचा साठा करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार 28 जानेवारीला सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाने गोडवूनवर धाड टाकली. या धाडीत लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. गोडाऊन मधील तीन खोल्यात गुटखा भरून ठेवण्यात आलेला होता. कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला.
हेही वाचा - टाकाऊ प्लास्टिकपासून बनवला 40 किलोमीटरचा रस्ता; वर्षात एकही खड्डा नाही
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईची माहिती घेण्यास पत्रकार पोहचले असता, पोलिसांनी त्यांना अडवून निघून जाण्यास सांगितले. मात्र, पत्रकारांनी ठाम भूमिका घेतल्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली. नागोठणे हद्दीत लाखोंचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला असला तरी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृत गुटखा विक्री सुरू असल्याबाबत पोलिसांना कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, अन्न व औषध प्रशासन पेण चे असिस्टंट कमिश्नर लक्ष्मण दराडे, बालाजी शिंदे फूड सेफ्टी ऑफिसर हे उपस्थित होते.