रायगड - मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मतदान जागृती मोहीम राबवण्यात आली. २३ एप्रिलला रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यासाठी महाड प्रेस असोसिएशनतर्फे शहरात मतदान वाढीसाठी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांनी शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदान करणे, हा आपला हक्क असून प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. हा हेतू लक्षात घेऊन महाड प्रेस असोसिएशनने शहरात प्रचार रॅली काढली. यावेळी असोसिएशन सदस्यांनी नागरिकांना मतदान करण्याचा नारा दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिक मतदानासाठी जास्तीत जास्त बाहेर पडत असतात. मात्र, शहरातील मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाही. त्यामुळे शहरातील मतदानाची टक्केवारी कमी असते. यासाठी शहरातील नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदान करावे यासाठी ही मतदान जागृती रॅली काढली असल्याचे मनोज खांबे यांनी सांगितले