ETV Bharat / state

अन्वय नाईक आत्महत्या : आरोपींच्या अटक वॉरंटसाठी अर्ज, 6 फेब्रुवारीला सुनावणी - अर्णब गोस्वामी लेटेस्ट न्यूज

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींसह इतर दोघेही आज न्यायालयात हजर नव्हते. तसेच, त्यांच्या वकिलांच्या वकिलपत्रावर आरोपींची सही नव्हती. यामुळे आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळून आरोपींना अटक वॉरंट काढावे, असा अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला. यावरील पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Jan 7, 2021, 6:47 PM IST

रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण खटला हा नव्याने आजपासून अलिबाग न्यायदंडाधिकारी याच्या न्यायलायत सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी न्यायलायत हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने अर्णब गोस्वामींसह इतर दोघांनाही केला होता. मात्र, तिघेही आज हजर झाले नाहीत. याबाबत न्यायालयात आरोपींना अटक वॉरंट काढण्याबाबत सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज केला आहे. यावर आता वॉरंट काढणे, आरोपींनी हजर राहणे, न राहणे यावर 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या : आरोपींच्या अटक वॉरंटसाठी अर्ज, 6 फेब्रुवारीला सुनावणी
अर्णबसह दोघेही आज हजर नव्हते

रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे याच्या न्यायलायत दोषारोप पत्र 4 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानुसार 7 जानेवारी रोजी न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, आज तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नव्हते.

हेही वाचा - मेट्रोने मुळा नदीतील काम थांबवावे, अन्यथा पूर परिस्थितीची शक्यता - मनसे

आज गैरहजर राहण्याची आरोपींना मुभा

अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी आरोपी दिल्ली येथे असून कोरोना नियमांमुळे हजर राहू शकत नाहीत, असा युक्तिवाद केला होता. तसेच, तीनही आरोपींना आज गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, न्यायालयाने आजची विनंती आरोपी वकिलांची मान्य केली आहे.

अटक वॉरंटसाठी सरकार पक्षातर्फे अर्ज दाखल

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात नव्याने दोषारोप पत्र दाखल केले असून पहिल्याच दिवशी आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांनी आपले वकील कोण हे न्यायालयाला सांगणे महत्त्वाचे होते. आरोपीच्या वकिलांनी आरोपींतर्फे दाखल केलेल्या वकिलपत्रावर आरोपींची सही नसून तसे काहीही नमूद केलेले नव्हते. त्यामुळे आरोपी वकिलांच्या अर्जावर आम्ही हरकत घेऊ, याची कल्पना आरोपी वकिलांना नव्हती. त्यामुळे आम्ही तीनही आरोपींविरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज केला आहे. याबाबत 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे विशेष सरकारी वकील अ‌ॅड. प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बिबट्या दिसल्याने वीटभट्टी मजुरांमध्ये दशहत, बिबट्या कॅमेऱ्यात कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.