ETV Bharat / state

रायगडची 'ती' हिरकणी ठरली कोकण रेल्वेची पहिली महिला रेल्वे चालक..! - कोकण कन्या प्रिया तेटगुरे

रायगडच्या माणगाव तालुक्यातील साळवे गावची कन्या प्रिया बाबुराव तेटगुरे हिला कोकण रेल्वेमध्ये पहिली महिला इंजिन चालक होण्याचा मिळाला आहे. सर्व कोकणवासियांना प्रियाचा अभिमान वाटत असून सोशल मीडियावर सध्या या कोकण कन्येचे जोरदार कौतुक होत आहे.

raigad
कोकण कन्या प्रिया तेटगुरे मिळाला कोकण रेल्वेतील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचा मान
author img

By

Published : Mar 8, 2020, 12:47 PM IST

रायगड - आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहतो. म्हणूनच 'मुलगी शिकली प्रगती झाली' असे आपण म्हणतो. हल्ली महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करताना आपण पाहत असतो. रायगडच्या माणगाव तालुक्यातील साळवे गावची कन्या प्रिया बाबुराव तेटगुरे हिला कोकण रेल्वेमध्ये पहिली महिला इंजिन चालक होण्याचा मान मिळाला आहे. सर्व कोकणवासीयांना प्रियाचा अभिमान वाटत असून सोशल मीडियावर सध्या या कोकण कन्येचे जोरदार कौतुक होत आहे. प्रियाचे रेल्वे चालवितानाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोकण कन्या प्रिया तेटगुरे मिळाला कोकण रेल्वेतील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचा मान

प्रिया कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील मुख्य कार्यालयात रुजू झाल्यानंतर तिने रेल्वे इंजिन चालविण्याचे वर्षभर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या कोकण कन्येला महिला म्हणून रेल्वे चालविण्याचा पहिला मान मिळाला आहे. प्रियाचे वडील माणगाव रेल्वेस्थानकात बुकिंग क्लार्क म्हणुन कार्यरत आहेत. आपल्या या कर्तृत्ववान मुलीचा त्यांना आभिमान वाटत असल्याचे ते सांगतात. प्रियाचे संपूर्ण इंजिनियरींगचे शिक्षण रत्नागिरीतच झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - महिला दिन विशेष : आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील यांनी बँकिंग क्षेत्रात उमटविला ठसा

रेल्वे सारख्या क्षेत्रात मुलींना काम करणे खरच अवघड आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या रणरागिणी महिलांना प्रोत्साहन मिळायलाच हवे. त्यांच्या पाठीशी कुटुंबाने आणि समाजाने खंबीर पणे उभे रहायला हवे, अशी कामगिरी प्रियाने केली असल्याच्या प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.