ETV Bharat / state

किल्ले रायगडावर 'प्री-वेडिंग' चित्रीकरण, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट - लग्नापूर्वी फोटोग्राफी रायगड किल्ला

स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्यावर प्री-वेडिंगसारखे प्रकार घडत असल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे स्थानिक व्यवसायिक तसेच किल्ल्यावर होणाऱ्या विविध कार्यक्रमावर बंदी घालणाऱ्या पुरातत्व विभागाने डोळेझाक केली असल्याचे या प्रकारावरून दिसत आहे. रायगड किल्ल्याचे पावित्र्य न जपणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

रायगड
रायगड
author img

By

Published : Jan 30, 2021, 8:20 PM IST

रायगड - रायगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्याच स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ल्यावर प्री-वेडिंगसारखे प्रकार घडत असल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे स्थानिक व्यवसायिक तसेच किल्ल्यावर होणाऱ्या विविध कार्यक्रमावर बंदी घालणाऱ्या पुरातत्व विभागाने डोळेझाक केली असल्याचे या प्रकारावरून दिसत आहे. रायगड किल्ल्याचे पावित्र्य न जपणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

'प्री-वेडिंग'चे सुटले आहे पेव

जिल्ह्यात सध्या नवविवाहित जोडप्यांमध्ये लग्नापूर्वी फोटोग्राफी म्हणजे प्री वेडिंग संकल्पना दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले याठिकाणी प्री वेडिंग फोटो शूट होत असलेली पाहायला मिळत आहेत. यासाठी अनेकवेळा स्थानिक प्रशासनाची परवानगीही घेतलेली नसते. जिल्ह्यासह मुंबई, पुणे या शहरातून लग्नापूर्वी शुटींगसाठी जोडपी येऊ लागली आहेत. यातून छायाचित्रकारांना चांगला व्यवसाय मिळालेला आहे. मात्र प्री-वेडिंग शुटींग करताना ऐतिहासिक वास्तू गड-किल्ले याचे पावित्र्य राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे याचा विसर पडलेला दिसत आहे.

किल्ले रायगडावर बाजारपेठेमध्ये सुरू होते चित्रीकरण

मुंबई येथून नव दाम्पत्य लग्नापूर्वीचे चित्रीकरण करण्यासाठी शुक्रवारी युनिटसह दाखल झाले होते. या युनिटने लग्नापूर्वी चित्रीकरण करण्यासाठी चक्क किल्ले रायगड निवडले. किल्ले रायगडावर बाजारपेठेत चित्रीकरण सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड हा शिवप्रेमींचा आदर्श आहे. किल्ले रायगडावर असे प्रकार घडणे हे अपमानास्पद असून याकडे पुरातत्व विभागानेही डोळे-झाक केली आहे. या प्रकाराबाबत पुरातत्व अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवभक्तांकडून जोर धरू लागली आहे. शिवभक्त सिद्धेश सुर्वे याने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.