ETV Bharat / state

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर पोहोचले माणगावात... बचाव कार्याचा घेतला आढावा - रायगड पाऊस अपडेट

भर पावसात अतिशय खडतर प्रवास करीत विरोधी पक्ष नेते दरेकर माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहोलचले आहेत. परंतु पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फुट पाणी असल्यामुळे पुढील मार्ग बंद करण्यात आले आहेत.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
author img

By

Published : Jul 23, 2021, 1:47 AM IST

Updated : Jul 23, 2021, 2:04 AM IST

रायगड - कोकणात पावसाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत.

माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. अशा स्थितीत भर पावसात अतिशय खडतर प्रवास करीत विरोधी पक्ष नेते दरेकर माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहोलचले आहेत. परंतु पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फुट पाणी असल्यामुळे पुढील मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत बचाव पथकही आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करुन येथील पूरपरिस्थीतीची व बचाव कार्याची माहीती घेतली.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर पोहोचले माणगावात

हेही वाचा-ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली!

संपूर्ण महाड व रायगडचा परिसर जलमय

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, बचाव दल आमच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करणार आहे. आम्ही सुध्दा एनडीआरएफ टीमसोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाड व रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा-वाईतील देवरुखकर वाडी वस्तीवर कोसळली दरड ; पाच जण अडकले

संकटाच्या स्थितीत आम्ही नागरिकांसोबत आहोत-

पुढे दरेकर म्हणाले, की अतिवृष्टीमुळे माणगाव, महाड येथील नागरिक घाबरले आहेत. अनेक नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमधील तळा येथील गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या बाजूला जलमय झालेल्या परिस्थितीत येतील नागरिक अडकले आहेत. पण या संकटाच्या स्थितीत आम्ही नागरिकांसोबत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा-नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात; मुख्यमंत्री सातत्याने संपर्कात

एनडीआरएफसह सैन्य दलाच्या तुकड्या कोकण विभागात तैनात

पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थती निर्माण झाली. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत

Last Updated : Jul 23, 2021, 2:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.