रायगड - रोहा तालुक्यातील रोहा शहर येथे रविवारी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये किंवा आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, दंगा फसाद सारखी अघटीत घटना घडू नये, यासाठी रोहा शहरातील तीन बत्ती नाका, मारुती चौक मेहेंदळे हायस्कूल दमखाडी नाका ते बाजारपेठ असा पोलीस रूट मार्च काढण्यात आला.
पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन -
नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करत सुरक्षिततेची व आत्मविश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सवात मिरवणूक काढण्यावर निर्बंध घालण्यात आले असल्याचे व विसर्जन करताना साधेपणाने कमीत कमी नागरिकांनी उपस्थित राहून मुखपट्टी परिधान करत सोशल डीस्टसिंगचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना संपर्क करणे व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता राहणार मास्की रोबोची नजर, उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार