ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ: शासनाच्या दौऱ्याने प्रशासनाचे हाल.. महत्वाची कामे प्रलंबित

author img

By

Published : Jun 11, 2020, 4:44 PM IST

3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर जिल्ह्यातील दक्षिण रायगडला मोठा आर्थिक फटका बसला. सायंकाळी वादळ शांत झाल्यानंतर वीजेच्या तारा, पोल, झाडाची पडझड अशी परिस्थिती निर्माण होऊन विदारक दृश्य निर्माण झाले होते.

political-leaders-visit-to-raigad-district-administration-busy-with-them
शासनाच्या दौऱ्याने प्रशासनाचे हाल..

रायगड- निसर्ग चक्रीवादळाने रायगडातील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण, श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक, बागायतदार शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, नेते मंडळी यांचे नुकसानग्रस्त भागात 4 जूनपासून दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची या संकटकाळात मात्र धावाधाव सुरू झाली आहे. महत्वाची कामे बाजूला राहून मंत्र्यांच्या आढावा बैठक आणि पाहणी दौऱ्यातच वेळ खर्ची होत आहे. त्यामुळे शासनाचे दौरे, प्रशासनाचे हाल तर नुकसानग्रस्त वाऱ्यावर अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

शासनाच्या दौऱ्याने प्रशासनाचे हाल..
3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर जिल्ह्यातील दक्षिण रायगडला मोठा आर्थिक फटका बसला. सायंकाळी वादळ शांत झाल्यानंतर वीजेच्या तारा, पोल, झाडाची पडझड अशी परिस्थिती निर्माण होऊन विदारक दृश्य निर्माण झाले होते. अनेकांची संसारे उध्वस्त झाले. बागायतदार पुढील 15 वर्ष मागे गेले. अशावेळी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते 4 जूनपासून रायगड दौऱ्यावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. वादळाने झालेली हानी मोठी असताना जिल्हा प्रशासनावर याचा मोठा ताण आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, पेण, रोहा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे याठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. तर जिल्ह्यातील अर्धा भाग हा वीजेविना काळोखात आहेत. वीज सुरू करण्याचा प्रयत्न महावितरण करीत आहे. मात्र जिल्ह्यात सुरू असलेल्या मंत्री, नेते यांच्या पाहणी दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मोठा ताण आहे. रोज दौरे, रोज बैठका यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सवड मिळत नाही. त्यामुळे एकीकडे कामे लवकर करण्याचे मंत्र्यांचे, विरोधी पक्षानेत्यांचे आदेश तर दुसरीकडे नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करण्यासाठी सुरू असलेली घाई, अशा दुहेरी कात्रीत सध्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सापडले आहेत.

जिल्हा प्रशासनाने वादळ शांत झाल्यानंतर त्वरित कामाला सुरुवात केली आहे. रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करुन सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुरू केले आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा 60 टक्के भागात पूर्वरत करण्यात आलेला आहे. मात्र, मंत्र्यांच्या, विरोधी पक्षनेत्यांच्या सुरू असलेल्या दौऱ्याने जिल्ह्याचे तसेच तालुक्याचे अधिकारी बेजार असल्याने नुकसानग्रस्त भागातील कामे रखडली जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.