ETV Bharat / state

प्रशांत कणेरकरांच्या सुसाईड नोटमधील मजकूर अजून गुलदस्त्यात

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रशांत कणेरकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आत्महत्येमागील कारण अजून अस्पष्ट असून चिठ्ठीतील मजकूर बाहेर आल्यावरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Aug 17, 2019, 8:21 PM IST

रायगड - तीन महिन्यांपूर्वीच अलिबाग येथे बदलीवर आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 16 ऑगस्ट रोजी रात्री पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात ही खळबळजनक घटना घडली.

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी प्रशांत कणेरकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मात्र, त्यात काय लिहिले आहे याबाबत पोलीस गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील कारण चिठ्ठीतील मजकूर वाचल्यावरच स्पष्ट होणार आहे. या घटनेने मात्र जिल्हा पोलीस दल हादरून गेले आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात प्रशांत यांच्या खोलीच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते झोपले असतील म्हणून स्वच्छता कर्मचारी निघून गेले. कणेरकर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फोनही उचलत नव्हते. म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर अलिबाग पोलीस दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी कणेरकर हे मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेहाचा पंचनामा करताना प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

मात्र, त्यात काय मजकूर आहे, हे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. चिठ्ठी कणेरकर यांच्या कुटुंबाला दाखवल्यावर त्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.

प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी सकाळीच आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज 17 ऑगस्ट रोजी मुंबई दादर येथे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस उपनिरीक्षक सागर कावळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

Intro:प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्यापूर्वी लिहिली होती सुसाईड नोट

सुसाईड नोट मधील मजकूर गुलदस्त्यात

सकाळीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता

रायगड : अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेले सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयातील अधीकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खकबळ जनक घटना 16 ऑगस्ट रोजी रात्री घडली. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. मात्र त्यात काय लिहिले आहे याबाबत पोलिसांनी गुप्तता ठेवलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुसाईड नोट मधील मजकूर कळल्यानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. Body:जिल्हा मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात प्रशांत कणेरकर यांच्या रूमची 16 ऑगस्ट रोजी साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते झोपले असतील म्हणून सफाई कामगार निघून गेले. कणेरकर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर अलिबाग पोलीस दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी कणेरकर हे रूममधील फॅनला गळफास लावून लटकलेले दिसले. Conclusion:समोरचे दृश्य पाहून पोलिसही काही क्षण हबकले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा केला. त्यावेळी प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र त्यात मजकूर काय आहे हे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. सुसाईड नोट कणेरकर यांच्या कुटूंबाला दाखविल्यानंतर त्याबाबत पुढील पावले उचलली जातील असे जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी सकाळीच आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज 17 ऑगस्ट रोजी मुंबई दादर येथे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस उपनिरीक्षक सागर कावळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र आत्महत्या का केली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.