रायगड - महाराष्ट्र राज्याचा ५९ वा वर्धापन दिन अर्थात एक मे निमित्त जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्ह्यातील १२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक, आंतरिक सुरक्षा पदक तसेच विशेष सेवा पदकांचे पदक प्राप्त झाले आहे. त्यांना पोलीस अधीक्षक अनिल पारस्करांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरवान्वित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
डॉ. रणजीत पाटील - विशेष सेवा पदक
के. एस. हेगाजे - अंतर्गत सुरक्षा पदक
धनाजी क्षीरसागर - पोलीस महासंचालक पदक
सुरेश वराडे - पोलीस महासंचालक पदक
सचिन गावडे - विशेष सेवा पदक
अमोल वळसंग - विशेष सेवा पदक
अजय शेवाळे - पोलीस महासंचालक पदक
सुधीर शिंदे - पोलीस महासंचालक पदक
हर्षकांत पवार - पोलीस महासंचालक पदक
राजेश चाळके - पोलीस महासंचालक पदक
बाबासाहेब लाड - पोलीस महासंचालक पदक
बिपीन थळे - पोलीस महासंचालक पदक