ETV Bharat / state

Raigad Crime आई म्हणणाऱ्या भाडेकरुनेच भाड्यासाठी घरमालकिणीचा गळा दाबून केला खून: पोलिसांनी आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Jan 6, 2023, 1:11 PM IST

उरणजवळील बोकडविरा गावात मंगळवारी एका 74 वर्षीय लीलावती ठाकूर (Old Woman Murder At Uran ) या वृद्धेचा खून केल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे उरण पोलिसांसमोर ( Uran Police Station ) आव्हान निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अमोल शेलार या मारेकऱ्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राजापूर येथून मुसक्या ( Police Arrested tenant From Rajapur ) आवळल्या आहेत. अमोल हा लिलावती ठाकूर यांचा भाडेकरू होता. मात्र वीज बिल आणि भाड्याच्या पैशावरुन त्यांचा वाद झाला होता.

Old Woman Murder Uran
पोलिसांसह मारेकरी अमोल शेलार

रायगड - वीज बील आणि खोलीच्या भाड्यासाठीच भाडेकरुने घरमालकीनीचा खून (Old Woman Murder At Uran ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी मारेकरी भाडेकरुच्या अहमदनगर जिल्ह्यातील राजापुरातून ( Police Arrested tenant From Rajapur ) मुसक्या आवळल्या आहेत. अमोल शेलार असे मारेकऱ्याचे नाव आहे. अमोलने उरणच्या बोकडविरा येथे लीलावती ठाकूर ( Old Woman Murder By tenant ) यांचा गळा आवळून मंगळवारी खून केला होता. अमोल हा आई वडिलांसह भावालाही मारहाण करत असल्याची माहिती त्याच्या गावातील नागरिकांनी दिली. पत्नी आणि मुलांशी देखील त्याचे कधीच पटले नसल्याची माहितीही समोर आली आहे.

आई म्हणायचा तिचाच दाबला गळा बोकडविरा गावात मृत लीलावती ठाकूर यांच्या खोलीमध्ये भाडोत्री म्हणून राहत असलेला अमोल खोली मालक असलेल्या लिलावती ठाकूर यांना नेहमी आई अशी हाक मारायचा. मात्र भाडे आणि वीज बील भरण्यासाठी लिलावती ठाकूर यांनी तगादा लावला होता. याचा राग आल्याने अमोल शेलारने गळा दाबून लीलावती यांचा खून केला. खून केल्यावर गावाकडे पळून गेलेल्या अमोल शेलार याला उरण पोलीस ठाण्याच्या ( Uran Police Station ) टीमने श्रीगोंद्यातील राजापूर गावात जाऊन पकडून आणला आहे.

भाडे, वीज बिलावरुन भांडण उरणच्या बोकडविरा गावात मंगळवारी सकाळी लीलावती ठाकूर या महिलेची हत्या झाल्याची घटना उघड झाली होती. त्या महिलेच्या काही खोल्या भाड्याने दिल्या गेल्या होत्या. त्यातील एक भाडेकरू महिलेच्या हत्येच्या दिवसापासून गायब होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय वाढला होता. त्यातूनच पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी संबंधित भाडेकरू तरुणाच्या गावाची माहिती घेऊन थेट श्रीगोंद्यातील राजापूर गाठले. राजापुरातील एसटी डेपो ( Rajapur ST Depo ) परिसरात आरोपी आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या प्राथमिक चौकशीतून अमोल शेलारने गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत लिलावती ठाकूर या भाडे आणि वीज बिलाची मागणी करताना सातत्याने भांडण करत होत्या. त्यामुळेच त्यांना ठार केल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळून आली असल्याचे समोर आले आहे .

घरमालाकांवर कारवाई करणे गरजेचे खोली अथवा दुकानाचा गाळा भाड्याने देते वेळेस भाडेकरूचे ओळखपत्र किवा कागदपत्रे भाडे करारासह पोलीस ठाणे, ग्रामपांचायात, नगरपालिका येथे जमा करण्याचा नियम आहे. मात्र अशाप्रकारे कुणीही घरमालक कागदपत्रे जमा करण्याची तसदी घेत नाहीत. यामुळे अशा गुन्हेगारी घटना घडल्यास आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण होते. यामुळे आता कागदपत्रे जमा न करणाऱ्या घरमालकांवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.