ETV Bharat / state

तळोजामधून शस्त्रे बाळगणाऱ्याला अटक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई - मावळ लोकसभा मतदारसंघ

आरोपीकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.

जप्त करण्यात आलेली पिस्तूल आणि काडतुसे
author img

By

Published : Apr 19, 2019, 6:37 PM IST

Updated : Apr 19, 2019, 8:36 PM IST

पनवेल - निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिसांनी शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीला तळोजामधून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अरुण विठ्ठल बेनकनहळी, असे आरोपीचे नाव आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. या मतदारसंघात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस दक्षतेने कार्यवाही करत आहेत.

तळोजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर निकम, पोलीस उपनिरीक्षक बिरप्पा लातुरे आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार तळोजा फेज-१ येथील सेक्टर २६ मधील शिर्के कन्स्ट्रक्शनजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी अरुण विठ्ठल बेनकनहळी (२५) या आरोपीकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. त्यांनतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्र तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपी हा मुळचा कर्नाटकातील असून तो तळोजा फेज-२ मध्ये राहत आहे.
न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींनी ही हत्यारे कुठून आणि कशासाठी आणली याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.

Intro:बातमीला फोटोज जोडत आहे.
Slug- MH_Panvel_WeaponsFindInTaloja_AV_20April2019_PramilaPawar

Location- पनवेल

ANchor
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून खडा पहारा देत आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे तळोजामध्ये एक भारतीय बनावटीचा लोखंडी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह एकाला रंगेहाथ पकडण्यात आलंय. Body:मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येत असून त्यापैकी पनवेल विधानसभा मतदार संघ महत्वाचा समजला जात आहे. यातुनच निवडणुकीच्या काळात कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी घेतलेल्या दक्षतेमुळे गुन्हेगारीवर काहीसा आळा बसला आहे. तळोजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर निकम, पोलीस उपनिरीक्षक बिरप्पा लातुरे आणि पथकाने त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळोजा फेज-१ येथील सेक्टर २६ मधील शिर्के कन्स्ट्रक्शन जवळ सापळा रचला. यावेळी अरूण विठ्ठल बेनकनहळी (वय २५) या आरोपीकडे एक भारतीय बनावटीचा लोखंडी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. त्यांनतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्र तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तो मुळचा कर्नाटकातील असून सध्या तळोजा फेज-२ मध्ये राहत आहे. आरोपीनी ही हत्यारे कुठून आणि कशासाठी आणली यांचा पोलीस शोध घेत आहेत. Conclusion:आरोपीला न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाली असून तळोजा पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत असल्याची माहिती, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली आहे.
Last Updated : Apr 19, 2019, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.