ETV Bharat / state

कोकणातील खड्डेमय रस्त्यांवरून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू - blocks in road raigad

गणेशोत्सव सणापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नॅशनल हायवे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांना महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. मात्र, पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा पडण्यास सुरुवात झाल्याने चाकरमान्यांना याच खड्डेमय रस्त्याने कोकणात जावे लागले.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
author img

By

Published : Sep 10, 2019, 5:50 PM IST

रायगड - गणेशोत्सव सणाला मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जाताना व येतानाचा प्रवासही खड्डेमय रस्त्यानेच करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, नॅशनल हायवे अधिकारी व ठेकेदार यांनी मुंबई गोवा हायवेची गणपतीपूर्वी मलमपट्टी करूनही खड्डे बुजविण्यात अपयशी ठरले आहेत.

कोकणात चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खड्डेमय रस्त्यानेच सुरू

हेही वाचा - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये जाहीर करावे; शेतकरी नेते जावंधियांचे पंतप्रधान मोदींना पत्र

गणेशोत्सव सणापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नॅशनल हायवे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांना महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. मात्र, पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा पडण्यास सुरुवात झाल्याने चाकरमान्यांना याच खड्डेमय रस्त्याने कोकणात जावे लागले.

हेही वाचा - नागपुरात धाडसी चोरी.. मॉलमध्येच अंघोळ करून घातले नवीन कपडे अन् दोन लाखांच्या रोकडवर मारला हात

तर सण साजरा झाल्यावर परतीचा प्रवास करताना खड्डे भरले गेले असतील, अशी भाबडी आशा प्रवाशांना होती. मात्र, ती आशा धूसर झाल्याने परतीचा प्रवासही खड्डेमय रस्त्यानेच करावा लागला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड, तारा गाव, जिते तसेच अंतोरे फाटा पेणपासून वडखळ, वडखळ ते महाड पर्यत रस्ता हा खड्डेमय झाला आहे. हे खड्डे खडी, माती टाकून तात्पुरते भरले गेल्याने पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Intro:चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खड्डेमय रस्त्यानेच सुरू

कोकणात जाताना व येताना रस्त्यावरचे खड्डे तसेच

रायगड : गणेशोस्तव सणाला मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जाताना खड्डेमय रस्त्यानेच जावे लागले असून परतीचा प्रवासही खड्यातूनच करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, नॅशनल हायवे अधिकारी व ठेकेदार यांनी मुंबई गोवा हायवेची गणपतीपूर्वी मलमपट्टी करूनही खड्डे बुजविण्यात अपयशी ठरले आहेत.Body:गणेशोस्तव सणापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नॅशनल हायवे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांना महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा पडण्यास सुरुवात झाल्याने चाकरमानी याना याच खड्डेमय रस्त्याने कोकणात जावे लागले.
Conclusion:चाकरमानी यांना गणेशोस्तव सणाला जाताना खड्डेमय रस्त्याने जावे लागले होते. मात्र सण साजरा करून येईपर्यत खड्डे भरले गेले असतील अशी भाबडी आशा चाकरमानी प्रवाशांना होती. मात्र त्याचीही आशा धूसर झाली असून परतीचा प्रवासही खड्डेमय रस्त्यानेच करावा लागला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड, तारा गाव, जिते तसेच अंतोरे फाटा पेण पासून वडखळ, वडखळ ते महाड पर्यत रस्ता हा खड्डेमयच झाला आहे. खड्डे हे खडी, माती टाकून तात्पुरते भरले गेल्याने पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.