ETV Bharat / state

सुटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे, नेरळमधील घटना

मृतदेहाचे तुकडे करून दोन सुटकेसमध्ये भरण्यात आले असून शरीराचे काही भाग आणि डोके घटनास्थळी सापडले नाहीत. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

raigad
raigad
author img

By

Published : Dec 17, 2020, 12:11 PM IST

रायगड - नेरळ रेल्वे स्थानक परिसरात गटाराच्या नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे तुकडे करून दोन सुटकेसमध्ये भरण्यात आले असून शरीराचे काही भाग आणि डोके घटनास्थळी सापडले नाहीत. घटनास्थळी नेरळ पोलीस आणि कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर यांनी तत्काळ धाव घेऊन तपास सुरू केला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकोशेडमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी पाहिला मृतदेह

नेरळ येथील माथेरान लोकोशेड येथे कार्यरत असलेल्या तरुणांना परिसरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मानवी शरीराचे अवयव दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नेरळ पोलिसांना याबाबत माहिती काळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन सुटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे

पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, नेरळ येथील माथेरान लोकोशेड आणि राज बाग या सोसायटीला लागून असणाऱ्या नाल्यात दोन सुटकेस फुगलेल्या अवस्थेत दिसून आल्या. या सुटकेसबाहेर काढल्या असता त्यामध्ये मानवी शरीराचे तुकडे केलेले अवयव सापडून आले. या मृतदेहाचे डोके आणि काही अवयव हे कुठेही आढळले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी मारल्याचा डॉक्टरांचा अंदाज

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डॉक्टराना पाचारण करण्यात आले. मृतदेहावरून एका 40 वर्ष वयोगट असलेल्या पुरुषाचा देह असून दोन दिवसापूर्वी या व्यक्तीला मारून टाकण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरने व्यक्त केला आहे.

मद्य पाजून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

मृत व्यक्तीस हत्याऱ्याने मारण्यासाठी वापरलेले साहित्य हे काही अंतरावर पोलिसांना एका प्लास्टिक पिशवत मिळून आले आहे. त्याबरोबर काही मद्यपीचे साहित्य तर घरातील वस्तूदेखील एकत्र सापडल्याने एक अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्याऱ्याने घरी बसून एकत्र मद्यपान केले, यानंतर शुद्धीत नसलेल्या या व्यक्तीचा फायदा घेत मारेकऱ्याने उशीच्या साह्याने श्वास गुदमरून व्यक्तीला मारल्यानंतर, मृत व्यक्तीच्या देहाचे मशीनच्या साह्याने तुकडे केले. यानंतर ते सुटकेसमध्ये भरण्यात आले. काही शरीराचे भाग हे सुटकेसमध्ये बसत नसल्याने ते एका पिशवीत भरून दुसरीकडे टाकले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.

आरोपीला पकडण्यास पथक रवाना

प्रथम या व्यक्तीची ओळख पटवण्यास पोलिसांना कसरत करावी लागणार असून मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान नेरळ पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मात्र अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्याचा शोध पोलिसांनी लावला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले असल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.