रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर वाहनांच्या सेवेसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून अनेक पेट्रोल पंप आहेत. साजगाव ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत असणाऱ्या एच.पी.पेट्रोल पंपात जवळपास 130 कामगार कार्यरत आहेत. या कामगारांच्या सुरक्षेसाठी तुटपुंजी सोय आहे. त्याचा परिणाम नुकताच येथे पाहायला मिळाला. एका कामगाराला वेळेवर उपचार करण्यासाठी उपाययोजना न मिळाल्याने, उशिरा दवाखान्यात दाखल करण्यात आले. या पंप व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे या कामगाराचा सातव्या दिवशी मुत्यू झाला आहे. या घटनेनंतर कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. त्यामुळे शनिवारी कामगारांनी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यत पेट्रोल पंप बंद ठेवल्याने वाहनांची मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आक्रमकतेमुळे मयत कामगारच्या कुटुंबाला नियमानुसार मिळणारे मोबदला यासह त्यांच्या कुटुंबासाठी साडेचार लाख रक्कम व्यवस्थापनाने मान्य केली आहे. त्यानंतर काही प्रमाणात हा हा तिडा सुटला सूटला असून, पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे.
सहा तास पंप बंद
एक्सप्रेसवे'वरील एच.पी. पेट्रोल पंपातील कामगार रमेश गोपाळ गायकवाड (वय 46, रा.साजगाव) हे मागील 13 वर्ष या पंपात कार्यरत होते. त्यांना 8 ऑगस्ट रोजी दुसऱ्या पाली येथे संध्याकाळच्या सुमारास कामावर कार्यरत असताना, त्यांना ह्दय विकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांना व्यंगत्वचाही झटका आला. यानंतर एच.पी.कंपनीने त्यांना उपचारासाठी तत्काळ घेऊन जाणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यांनतर उशिरा त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. मात्र, लोणावळा येथे संचयती रुग्णालयात उपचार घेत असताना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत व्यवस्थापनाला तत्काळ दिली. मात्र, त्याकडेही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कामगार वर्गात संतापाची लाट निर्माण झाली. या दिवसी सकाळपासून पंप बंद ठेवून कामगाराला भरपाई मिळाली पाहिजे अशी सर्वांनी भूमिका घेतली.
कामगार वर्गाचा व्यवस्थापणा विरोधात संताप
स्थानिक नेते जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील, खोपोलीचे नगरसेवक सुनील पाटील, माजी उपसरपंच सदस्य अजित देशमुख, स्थानिक नेते दीपक कडव, अनिल खालापूरकर यासह युनियन नेते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक, पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर संजय शुक्ला, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोली चे उप पो.नि.सतिष असवर, सह्यक पो नि कल्याणी पाडोळे, सह्य पो नि कदम यांच्या समवेत वरिष्ठ अधिकारी जॉर्ज थॉमस, मंगेश तेलंग, सुधीर कंठे बरोबर बैठक घेऊन नातेवाईकांच्या मागणी नुसार मदत करावी अशी सूचना केली.
लोकप्रतिधीच्या आक्रमकतेमुळे कुटुंबाला मिळाली भरपाई
कंपनी प्रशासन नियमाच्या व्यतिरिक्त मदत करण्यास तयारच होत नसल्याने, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, नगरसेवक सुनील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर पोलीस प्रशासनाच्या मदतीने गायकवाड यांच्या कुटुंबाला नियमानुसार मिळणारा मोबदला व त्या व्यतिरिक्त साडेचार लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते व कामगार शांत झाले. त्यानंतर नातेवाईकांनी मृत्यूदेह ताब्यात घेऊन कामगारांनीही पेट्रोल पंप सुरू केला. एकंदरीत व्यवस्थापनाने आपले कुटुंब समजून या कामगाराला न्याय देणे गरजेचे असताना मृत्यूदेहांची अवहेलना केल्याची चर्चा होती.
'कामगारांनी एकजूठ महत्वाची'
मयत कामगारांच्या मृत्यू नंतर ही एच.पी.पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन कामगारांना वाऱ्यावर सोडते. कसलीही सहानभूती न दाखवता नियमांची बाजू सांगून दुर्लक्ष करते. मात्र, येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाची भूमिकेमुळे हे व्यवस्थापन वठणीवर आले. अन्यथा नियम शिकवून गायकवाड कुटुंबाला भरपाई पासून दूर ठेवले असते, यात कामगारांनी घेतलेली भूमिका प्रत्येक कामगारांसाठी यापुढे हिताची ठरेल.