खालापूर (रायगड) - अनेक वर्षापासून खोपोलीत बाजारपेठेतील रस्त्यावर भरणारा गुरुवार आठवडा बाजार लॉकडाउननंतर फुललेला पहावयास मिळाला असून या अनेकांना कोरोनाचे भय नसल्याचे पाहायला मिळत असून अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कसुध्दा पाहायला मिळाले नाहीत.
खालापूर जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खोपोली शहर हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले ठिकाण आहे. खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ गृहोपयोगी व अन्य सामान खरेदीसाठी खोपोलीत येत असतात. ग्रामस्थांच्या मागणीनुसार खोपोलीत गुरुवारी साप्ताहिक बाजार भरतो. या बाजारात खेड्यापाड्यातील शेतकरी व विशेषत: महिला मोठ्या प्रमाणात येत असतात. साप्ताहिक बाजारामुळे येथील दुकानातील व्यापारांचाही व्यवसाय होत असतो.
कोरोनाचे नाही नागरिकांना भय?
लॉकडाउनमध्ये हा बाजार बंद करण्यात आला होता. कोविडची तीव्रता कमी झाल्यानंतर नगरपालीकेने साप्ताहिक बाजाराला परवानगी दिल्याने खोपोलीतील गुरुवार आठवडा बाजारपेठे फुलला असून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाला असला तरी अनेकांना कोरोनाचे भय न राहिल्याचा पाहावयास मिळाले. कारण अनेकांनी सुरक्षेच्या बाबतीच कोणतीही काळजी न घेतल्याने बहुतांशी ग्राहकांसह दुकानदारांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.