ETV Bharat / state

जिल्ह्यात संचारबंदीनंतर आलेल्या लाखभर चाकरमान्यांमुळे रायगडकरांना फुटला घाम - कोरोना प्रभाव रायगड

मुंबईमध्ये तसेच इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जिल्ह्यातील चाकरमान्यांना आपले गाव बरेसे वाटू लागले. मात्र, वाहतूकसेवा बंद असल्याने अनेकजण हे रस्त्याने, रेल्वे रुळाने पायी चालत येऊ लागले. तर, काहीजण आपली वाहने घेऊन येऊ लागले. त्यामुळे संचारबंदी काळात रस्त्याने पायी चालत येणाऱ्याची संख्या वाढू लागली आणि ही संख्या आता लाखावर पोहचली आहे. मात्र, येणाऱ्या या नागरिकांमुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

जिल्ह्यात संचारबंदीनंतर आलेल्या लाखभर चाकरमान्यांमुळे रायगडकरांना फुटला घाम

author img

By

Published : Apr 19, 2020, 3:08 PM IST

Updated : Apr 19, 2020, 3:18 PM IST

रायगड - मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी हे आपल्या गावी चालत, वाहनाने येऊ लागले आहेत. रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई, राज्य, परराज्य आणि परदेशातून 1 लाख 3 हजार 26 नागरिक दाखल झाले आहेत. यात अलिबाग, महाड, माणगाव, म्हसळा या तालुक्यात १० हजारांच्यावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडकरांच्या डोक्याचा ताप वाढू लागला आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असतानाही एवढे नागरिक आले कसे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

संचारबंदीदरम्यान आलेले स्थलांतरित मजुर, कामगार

जिल्ह्यात मुंबई, राज्यातून परराज्यातून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे दोन जणांना कोरोना बाधा झाली असल्याने रायगडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात लाखभर नागरिक दाखल झाल्यामुळे जिल्हा प्रशासनावरही त्याचा ताण पडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशात वाढू लागल्यानंतर 22 मार्चपासून पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागू केला. संचारबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्याच्या अंतर्गत सीमा या बंद करण्यात आल्या. त्यामुळे बाहेरील आणि जिल्ह्यातील व्यक्तींना बंदी घालण्यात आली. जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरातच बसा असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.

जिल्ह्यात संचारबंदीनंतर आलेल्या लाखभर चाकरमान्यांमुळे रायगडकरांना फुटला घाम

मुंबईमध्ये तसेच इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जिल्ह्यातील चाकरमान्यांना आपले गाव बरेसे वाटू लागले. मात्र, वाहतूकसेवा बंद असल्याने अनेकजण हे रस्त्याने, रेल्वे रुळाने पायी चालत येऊ लागले. तर, काहीजण आपली वाहने घेऊन येऊ लागले. त्यामुळे संचारबंदी काळात रस्त्याने पायी चालत येणाऱ्याची संख्या वाढू लागली आणि ही संख्या आता लाखावर पोहचली आहे. मात्र, येणाऱ्या या नागरिकांमुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

जिल्ह्यात मुंबई, राज्यातून, परराज्यातुन आणि परदेशातून नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे. यामध्ये अलिबाग 12 हजार 611, कर्जत 698, खालापूर 1 हजार 472, पेण 2 हजार 821, पनवेल 172, पोलादपूर 7 हजार 477, महाड 12 हजार 424, माणगाव 18 हजार 329, म्हसळा 14 हजार 208, मुरुड 4 हजार 107, सुधागड 8 हजार 37, श्रीवर्धन 6 हजार 553, रोहा 5 हजार 56, तळा 8 हजार 547, उरण 514 असे एकूण 1 लाख 3 हजार 26 नागरिक संचारबंदी काळात जिल्ह्यात दाखल झाले असून सदर माहिती ही जिल्हा परिषदेने संकलित केलेली आहे.

जिल्ह्यात श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे आलेल्या नागरिकामुळे दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या घटनेनंतर लाखभर आलेल्या इतर नागरिकांमुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून अनेकजण हे क्वारंन्टाइन असून काही जणांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने होम क्वारंन्टाइन केले आहे. यातील अनेकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष असून अजून काही दिवस निगराणी ठेवली जाणार आहे. ज्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही त्यांच्यावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा हे लक्ष ठेऊन आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य प्रशासन यांच्या एकोप्याने जिल्ह्यात कोरोनाबाबत एक्शन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांनीही शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Apr 19, 2020, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.