ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात आज साजरी होणार गटारी; खवय्यांची पावले मटण, चिकन दुकानाकडे

गटारीनिमित्त जिल्ह्यात 50 ते 60 हजार बोकडांचे मटण फस्त केले जाण्याची शक्यता आहे. गटारीनिमित्त अनेकांनी पार्टीची तयारी केली आहे. बुधवारी सकाळपासूनच खवय्यांनी मटण चिकण दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत.

गटारी निमित्त खवय्यांची मटण दुकानावरील गर्दी
author img

By

Published : Jul 31, 2019, 12:18 PM IST

रायगड - शुक्रवारपासून श्रावण महिन्यास सुरुवात होत असल्याने साऱ्यांनाच गटारी अमावस्येचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात गटारी बुधवारी साजरी होणार आहे. काही नागरिकांनी रविवारपासूनच गटारी साजरी करायला सुरुवात केली आहे. गटारीनिमित्त रायगडातील खवय्ये आता मटणावर ताव मारण्याच्या तयारीत आहेत.

गटारी निमित्त खवय्यांची मटण दुकानावरील गर्दी

बुधवारी पहाटे पासूनच मटण, चिकन दुकानांवर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अलिबाग बकरे, मटण खाटीक संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घरत यांनी पावसामुळे मटणाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, मटणाचे भाव वाढले नसल्याने खवय्यांची चिंता मिटली. त्यामुळे गटारीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मटण, चिकनचा आस्वाद घेतला जाणार आहे. श्रावण सुरू झाला की अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी श्रावण पाळणारे आणि मद्यपी गटारी अमावस्येची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी 2 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे.

बुधवार हा मांसाहारासाठी अनेकांचा पसंतीचा असल्याने या दिवशी गटारी अमावस्या असल्यामुळे नागरिकांसाठी सोनेपे सुहागा असल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे गटारी साजरी करण्याचे पार्टीचे बेत तयार झाले आहेत. बुधवारी पहाटेपासून मटण, चिकन दुकानांवर रांगा लागल्या आहेत. गटारीच्या निमित्ताने मटण विक्रेत्यांनी कल्याण, चाकण येथून बोकड आणले आहेत. अलिबाग तालुक्यात साधारण साडेतीन हजार बोकड आणले आहेत. जिल्ह्यात गटारी निमित्त 50 ते 60 हजार बोकडांचे मटण बुधवारी फस्त केले जाईल, असे चित्र आहे. गटारी निमित्त अनेकांनी पार्टीची तयारी केली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात मोठ्या प्रमाणात बोकड मृत्युमुखी पडले. बाजारात विक्रीसाठी बकऱ्या कमी आल्या त्यामुळे खरेदी सहाशे रुपये किलोने झाली. पावसाची झळ मटण विक्रेत्यांना पोहचली होती. त्यामुळे गटारी अमावस्येच्या निमित्ताने मटणाचे भाव किलोला 50 ते 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. मात्र, मटणाचे भाव वाढले नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Intro:
जिल्ह्यात आज बुधवारी साजरी होणार गटारी

मांसाहार खवय्यांची पावले मटण, चिकन दुकानाकडे

50 ते 60 हजार बोकड होणार फस्त

पार्टीचे ठरले बेत

रायगड : शुक्रवारपासून श्रावण महिन्यास प्रारंभ होत असल्याने साऱ्यांनाच वेध लागले आहेत, ते आज बुधवारी सुरु होणाऱ्या गटारीचे. तर काहींनी रविवार पासूनच गटारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगडातील खवय्ये आता मटणावर ताव मारण्याच्या तयारीत आहेत. आज पहाटे पासूनच मटण, चिकन दुकानांवर ग्राहकांनी खरेदी साठी गर्दी केली होती. मात्र पावसामुळे मटणाचे दर वाढण्याची शक्यता अलिबाग बकरे, मटण खाटीक संस्थेचे उपाध्यक्ष तथा घरत मटण विक्रेते राजेंद्र घरत यांनी वर्तविली होती. मात्र मटणाचे भाव वाढले नसल्याने खवय्यांनी निश्वास सोडला आहे. त्यामुळे गटारीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मटण, चिकनचा आस्वाद घेत मद्याचे पेलेही आज रिचविले जाणार आहेत. Body:श्रावण सुरू झाला की अनेकजण मांसाहार पाळत असतात. श्रावणात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी श्रावण पाळणारे व मद्यपी हे गटारी अमावस्येची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी 2 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे बुधवार 31 जुलै रोजी गटारी आली असल्याने सोनेपे सुहागा असा दिवस आल्याने गटारी साजरे करण्याचे पार्टीचे बेत तयार झाले आहेत.

बुधवार वार हा मांसाहारचा वार असल्याने आज पहाटे पासून मटण, चिकन दुकानांवर रांगा लागलेल्या आहेत. गटारीच्या निमित्ताने मटण विक्रेते यांनी कल्याण, चाकण येथून बोकड आणलेले आहेत. अलिबाग तालुक्यात साधारण साडेतीन हजार बोकड आणले असल्याचे समजते आहेत. तर जिल्ह्यात गटारी साजरी होत असल्याने 50 ते 60 हजार बोकड बुधवारी फस्त केले जातील असे चित्र आहे. तर गटारी निमित्त अनेकांनी पार्टीचे बेत आखले असल्याने मटणा सोबत मद्याचीही तयारी मद्यापीनी केली आहे.Conclusion:रायगड जिल्हयामध्ये गेल्या चार दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसात पुरपरिस्थिती निर्माण झाली. या पावसात मोठ्या प्रमाणात बोकड मृत्यूमुखी झाले. बकऱ्या बाजारात कमी आल्या. खरेदी सहाशे रुपये किलोने झाली. त्यामुळे पावसाची झळ मटण विक्रेत्यांवरही पोहचली होती. त्यामुळे गटारी अमावस्येच्या निमित्ताने मटणाचे भाव किलोला 50 ते 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. मात्र मटणाचे भाव वाढले नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.