ETV Bharat / state

कोरोना थर्मल स्कॅनिंग करून घेतली पत्रकारांच्या आरोग्याची काळजी; पेण प्रेस क्लबचा उपक्रम - news about corona virus

पेण प्रेस क्लब आणि डॉ धुमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेण तालुक्यातील सर्वच पत्रकार बंधूनी एकत्र येत उत्फुर्त सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली.

pen-press-club-took-care-of-the-health-of-journalists-by-conducting-corona-thermal-scanning
कोरोना थर्मल स्कॅनिंग करून घेतली पत्रकारांच्या आरोग्याची काळजी; पेण प्रेस क्लब व डॉ.शेखर धुमाळ यांचा उपक्रम
author img

By

Published : May 6, 2020, 7:45 PM IST

रायगड - राज्यासह देश कोरोना विषाणू विरुद्ध लढाई लढत आहे. या लढाईत पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या बरोबरच पत्रकार देखील सामील आहेत. मात्र, या लढाईत प्रशासनाच्या खांद्याल खांदा लावून काम करणारे पत्रकार एकाकी पडले आहेत. यामुळे पेण प्रेस क्लब आणि डॉ धुमाळ यांच्या हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्वच पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.

कोरोना थर्मल स्कॅनिंग करून घेतली पत्रकारांच्या आरोग्याची काळजी; पेण प्रेस क्लब व डॉ.शेखर धुमाळ यांचा उपक्रम

आज संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस, डॉक्टर, नर्स व प्रशासन यांच्या बरोबरच पत्रकार देखील या लढाईत सामील झाले आहेत. कोरोनाच्या लढाईतील पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सरकारने विविध प्रकारच्या आरोग्य योजना तसेच विमा योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा पत्रकार सर्वच स्तरातून दुर्लक्षित केला जात आहे. पत्रकारांच्या आरोग्याकडे ना सरकारचे लक्ष गेले आहे, ना राजकीय नेत्यांचे, ना कोणत्या वृत्तपत्रांच्या मालकांचे, यामुळे या लढाईतील पत्रकार हा एकाकी पडला आहे. पत्रकारांच्या या एकाकी लढाईत रायगड प्रेस क्लब संघटना पुढे आली आहे. रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्रेस क्लबच्या सहकार्याने पेण प्रेस क्लब व प्रसिद्ध डॉक्टर शेखर धुमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अध्यक्ष देवा पेरवी यांच्या प्रयत्नांनी पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पेण तालुक्यातील सर्वच पत्रकार बंधूनी एकत्र येत उत्फुर्त सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली. या मोफत आरोग्य तपासणीत पत्रकारांची कोरोना थर्मल स्कॅनिंग तसेच ब्लडप्रेशर, शुगर व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी यांच्या प्रयत्नांने पेण प्रेस क्लब व डॉक्टर शेखर धुमाळ क्लिनिक यांनी कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूची लागण पत्रकार बांधवांना होऊ नये, त्यांनी स्वतःसह परिवाराच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली. यावेळी डॉ.धुमाळ यांनी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी केल्याने सर्व पत्रकारांनी त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी डॉक्टर शेखर धुमाळ यांनी पत्रकारांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणती उपाय योजना करावी बाबत मार्गदर्शन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.