ETV Bharat / state

Raigad Crime News : व्हेल माशाची दोन कोटींची उलटी पेण पोलिसांकडून जप्त; पाच आरोपी अटकेत - व्हेल मासा उलटी मराठी बातमी

पेण येथे पोलिसांनी व्हेल माशाच्या उलटीची विक्री ( Whale Fish Vomit ) करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. येथील सरकारी रुग्णालायच्या परिसरात व्हेल विक्री करताना पेण पोलिसांनी पाच जणांना अटक केली ( Pen Police Arrested Five Men ) आहे.

Pen Police
Pen Police
author img

By

Published : Apr 4, 2022, 10:17 PM IST

पेण ( रायगड ) - पेण येथे पोलिसांनी व्हेल माशाच्या उलटीची विक्री ( Whale Fish Vomit ) करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. येथील सरकारी रुग्णालायच्या परिसरात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करताना पेण पोलिसांनी पाच जणांना अटक केली ( Pen Police Arrested Five Men ) आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हेल माशांची उलटी गोळा करुन तीची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही या माशाच्या उलटीची तस्करी करून यामधून करोडो रुपये कमविले जातात. त्याच पार्श्वभूमीवर व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पेण पोलिसांनी शहरात बंदोबस्त लावला. 3 मार्चच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात इन्होवा क्रिस्टा गाडी ( एम एच ४७ ए टी ८८७९ ) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सदर गाडीची कसून तपासणी केली. त्या गाडीत व्हेल माशाची अंदाजे 2 किलो वजनाची उलटी सापडली. सदर उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास दिड ते दोन कोटी रुपयांच्या वर किंमत आहे.

याप्रकरणी विजय परदेशी, प्रेमविर सिंग ( रा. उत्तर प्रदेश), सदानंद मोरे ( रा. रत्नागिरी ), अमोल राघो ( रा. नागपूर ), अजय आबांवडे ( रा.सांगली ) अशा पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये नुसार कलम 39, 44, 49 (ब), 57, 51 सह भादवी कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना आज पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.जे.घाडगे या करीत आहेत.

हेही वाचा - Mumbai School Bus Missing : अखेर 'ती' स्कूल बस सापडली; पालकांचा जीव भांड्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.