ETV Bharat / state

पेण अर्बन बँकेचे विलीनीकरण करावे - भाजपा नेते सुनील गोगटे - खालापूर

पेण अर्बन बँकेचे विलीनीकरण करण्याची मागणी भाजप नेते सुनील गोगटे यांनी राज्याचे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

anurag thakur
author img

By

Published : Mar 20, 2021, 4:03 PM IST

रायगड - पेण अर्बन या अग्रगण्य बँकेत नागरिकांनी विश्वासाने कष्टाने कमावलेले पैसे बँकेत ठेवले होते. परंतु 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अचानक पूर्वसूचना न देता बँक बंद झाल्याने खातेदारांचे लाखो रुपये अडकले आहे. त्यामुळे पेण को-ऑप अर्बन हिचे अन्य बँकांमध्ये विलीनीकरण करावे ही मागणी भाजपा नेते सुनील गोगटे यांनी राज्याचे अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
कर्जत तालुक्यामधून सर्वात जास्त खातेदार होते. अद्यापही त्यांना हक्काची रक्कम मिळाली नाही. मात्र, व्याजावर व्याज घेण्यासाठी नोटीस बजावून तगादा लावला जातो. याप्रकरणी विचारविनिमय झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदन सादर केले आहे.

बँकेत हजारो ठेवीदारांचे करोडो बुडाले आहेत
या पेण अर्बन बँकेत सर्वसामान्यांचे शेकडो कोटी रुपये बुडाले आहेत. गेली 10 ते11 वर्षे संघर्ष समितीच्या माध्यमातून खातेदार विविध स्तरावर लढा देत आहेत. परंतु या कालावधीत अनेक लोकांना जीवाला मुकावे लागले आहे. काहींची महत्त्वाचे कामे पैशाअभावी झाली नाहीत. तर, काहींची लग्नकार्ये होऊ शकली नाहीत. तसेच काहींना उपचार करण्यासाठी पैसे असूनही मिळाले नाही.सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. यात हजारो ठेवीदारांचे करोडो रुपये बुडाले आहेत. त्यांना ते पैसे परत मिळाल्यास, खातेदारांचे जीवन सुखकर होईल असे सुनील गोगटे यांनी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदनात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.