ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबईसह पनवेलमधील तरुण पुढे सरसावले

संकल्प प्रतिष्ठानातील तरुण नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन करत पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, कपडे, कोरडा खाऊ, औषध, लहान मुलांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य जमा करत आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण पूढे सरसावले
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:17 AM IST

रायगड- भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...’ या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ तल्या ओळींनाही बघवली जाणार नाही, अशी अवस्था सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. अन्न, पाणी तसेच कपड्यांसह रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंसाठी शेकडो लोक मदत केंद्रांसमोर रांगेत उभे आहेत. अशावेळेस या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण धावून आले आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण पुढे सरसावले

ज्या पश्चिम महाराष्ट्राकडून सहकार चळवळ शिकायला मिळाली, आज त्याच पश्चिम महाराष्ट्रातील लोक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. महापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करत आहेत. पूरग्रस्तांना मदत करायला अनेक हात उभे झाले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील संकल्प प्रतिष्ठानचे तरुण देखील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत.

संकल्प प्रतिष्ठानातील तरुण नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन करत पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, कपडे, कोरडा खाऊ, औषध, लहान मुलांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य जमा करत आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर नवी मुंबई, पनवेलहूनच नव्हे, तर वसई विरार येथून देखील नागरीक स्वतः हून मदतीसाठी संपर्क करत असल्याची प्रतिक्रिया, संकल्प प्रतिष्ठानाचे सूरज वायदंडे यांनी दिली आहे.

पनवेलकरांनी केलेली सर्व मदत एकत्र जमा करून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर, केवळ लोकांच्या सहकार्यावर अवलंबून न राहता संकल्प प्रतिष्टानच्या सर्व तरुणांनी जमा केलेल्या वर्गणीतूनही आवश्यक साहित्य नवी मुंबईत खरेदी करून ते पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संकल्प प्रतिष्टानचे निलेश चौधरी यांनी सांगितले.

या कार्यात विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळाला. तसेच शाळा महाविद्यालयांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र नवी मुंबईत पहायला मिळाले, असे संकल्प प्रतिष्ठानच्या तरुणांनी संगीतले आहे. ही मदत मिळवण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे सुरज वायदंडे, निलेश चौधरी, सूर्यकांत सावंत, विनय टिबे, जयेश रेळे, श्रीकांत माने, आतिष सुतार, सुरेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली. मदत ही एक चळवळ असून ती ‘नागरिकांच्या वतीने नागरिकांसाठी’ राबवलेली आहे, अशी भावना यावेळी संकल्प प्रतिष्ठानच्या तरुणांनी व्यक्त केली.

Intro:सोबत चौपाल जोडला आहे.

पनवेल

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...’ या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’तल्या ओळींनाही बघवली जाणार नाही, अशी अवस्था सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरुये. पुरातल्या पाण्याचा मारा सहन करत एक सगळ्यांच्या घराच्या भिंती कशाबशा उभ्या आहेत. अन्न, पाणी तसंच कपडे यासह रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसाठी मदत केंद्रासमोरच्या रांगेत उभी राहिलेली शेकडो माणसं आजही आपल्या घरच्यांसाठी खाण्यासाठी काही मिळतंय का? त्यांच्या औषध आणि गोळ्यांची काही सोय होतेय का? ही धडपड सुरूच आहे. यातील पूरग्रस्तांना सरकारी मदत अत्यंत तोकडी असून आता नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
Body:
ज्या पश्चिम महाराष्ट्राकडून सहकार चळवळ शिकायला मिळाली, आज त्याच पश्चिम महाराष्ट्रातील लोक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. महापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळ कुठे आणि कसे लावणार, अशी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करीत आहेत. पूरग्रस्तांना मदत करणारे अनेक हात उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील संकल्प प्रतिष्ठानचे तरुण देखील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. संकल्प प्रतिष्ठानचे हे तरुण नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना मदतीच आवाहन करून पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, कपडे, कोरडा खाऊ, औषध, लहान मुलांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आदी येत्या दोन दिवसांत जमा करीत आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून या मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर नवी मुंबई किंवा पनवेलहुन नाही तर वसई विरार इथून देखील नागरीक स्वतः हुन मदतीसाठी संपर्क करीत असल्याची प्रतिक्रिया संकल्प प्रतिष्ठानचे सूरज वायदंडे यांनी सांगितलं. फुल न फुलाची पाकळी म्हणून नवी मुंबई आणि पनवेलकरांनी केलेली ही सर्व मदत एकत्र जमा करून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे. शहरातील विविध भागातून तांदूळ, डाळी, मसाले, चहा, रवा, लहान बाळांचे खाद्य, सुके खाद्यपदार्थ, बिस्किटे, लहान मुलांचे कपडे, बेडशिट, चादर, साड्या, चप्पल, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन्स, बेबी डायपर, पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या, औषधे, सोलर दिवे, टॉर्च, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू इत्यादी वस्तू जमा करून त्या मदत म्हणून देण्यात आल्या. याशिवाय केवळ लोकांच्या सहकार्यावर अवलंबून न राहता संकल्प प्रतिष्टानच्या सर्व तरुणांनी वर्गणी जमा करून त्यातूनही आवश्यक साहित्य नवी मुंबईत खरेदी करून ते पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संकल्प प्रतिष्टानचे निलेश चौधरी म्हणाले.Conclusion:सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळाला. तसेच शाळा महाविद्यालयांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र नवी मुंबईत पहायला मिळाले असे संकल्प प्रतिष्ठानच्या तरुणांनी संगीतले. ही मदत मिळवण्यासाठी संकल्प प्रतिष्टानचे सुरज वायदंडे, निलेश चौधरी, सूर्यकांत सावंत, विनय टिबे, जयेश रेळे, श्रीकांत माने, आतिष सुतार, सुरेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली. मदत ही एक चळवळ असून ती ‘नागरिकांच्या वतीने नागरिकांसाठी’ राबवलेली आहे अशी भावना यावेळी संकल्प प्रतिष्टानच्या तरुणांनी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.