ETV Bharat / state

साडेतीन वर्षांंपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गोव्यातून केली अटक - panvel police arrested accused

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा आणि आपल्या सहा वर्षाच्या मुलीचा खून करून साडेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

raigad
साडेतीन वर्षांंपासून पोलिसांना गंगारा देणाऱ्या आरोपीला गोव्यातून केली अटक
author img

By

Published : Jan 31, 2020, 8:03 AM IST

रायगड - चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. साडेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने गोव्यातून पकडून गजाआड केले आहे. आरोपीने पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर दोघींचे मृतदेह गव्हाणफाटा चिरनेर मार्ग आणि कळंबोली-चिंचपाडा रोडवर फेकून दिले होते. श्रीमंत अण्णा नागरगोजे असे आरोपीचे नाव असून, तो गोव्यातील एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

साडेतीन वर्षांंपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गोव्यातून केली अटक

हेही वाचा - वैद्यकीय महाविद्यालय कामाच्या हालचालींना वेग, अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना माहिती दिली. त्या अनुषंगाने विशेष पोलिस पथक तयार केले. पोलिसांनी आपले कसब पणाला लावून गोव्यात नाव बदलून राहणाऱ्या आणि तेथे काम करीत असलेल्या आरोपी नागरगोजे याला हॉटेलमध्ये सापळा रचून शिताफीने पकडले. न्यायालयाने आरोपीला 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

हेही वाचा - नागोठणेत अवैध गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; लाखोंचा गुटखा जप्त

संबधित घटना 16 जून 2016 ची आहे. कळंबोली-चिंचपाडा मार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच दरम्यान, गव्हाणफाटा चिरनेर रोडवर सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह उरण पोलिसांना आढळून आला होता. हा मृतदेह नक्की कोणाचा आहे याचा पोलिसांनीही तपास सुरू केला होता. तपास सुरू असताना जेजुरी पोलीस ठाण्यात मायलेकीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली होती. मृत महिलेची आई मंदाकिनी सानप यांना शहर पोलिसांनी बोलावून दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली होती. या दुहेरी हत्याकांडाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

हेही वाचा - टाकाऊ प्लास्टिकपासून बनवला 40 किलोमीटरचा रस्ता; वर्षात एकही खड्डा नाही

मृत महिलेचा पती पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी आपले कसब पणाला लावत ओळख लपवून गोव्यात काम करणाऱ्या आरोपीला शोधून काढले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार बाबाजी थोरात, विजय आहिरे, पोलिस नाईक अजय वाघ, पंकज पवार, पोलिस शिपाई अनिल मानकर यांनी साडेतीन वर्ष आपली ओळख लपवून पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गजाआड केले.

Intro: पत्नी व लहान मुलीचा खून करून सलग तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींला पोलिसांनी केले गजाआड....

नवी मुंबई:

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलीचा खून करून साडेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत राहिलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गोव्यातून पकडून गजाआड केले आहे. पत्नी व मुलीच्या हत्येनंतर दोघींचे मृतदेह गव्हाणफाटा, चिरनेर मार्ग आणि कळंबोली-चिंचपाडा रोडवर फेकून दिले होते.
श्रीमंत नागरगोजे असे आरोपीचे नाव असून, तो गोव्यातील एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांनी पोलिस आयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त अशोक दूधे, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना माहिती दिली. त्या अनुषंगाने विशेष पोलिस पथक तयार केले. पोलिसांनी आपले कसब पणाला लावून गोव्यात आपले नावं बदलून राहणाऱ्या व तेथे काम करीत असलेला आरोपी श्रीमंत अण्णा नागरगोजे याला हॉटेलमध्ये सापळा रचून शिताफीने पकडले व पनवेलला आणले. न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

घटनाक्रम

संबधित घटना 16 जून 2016ची आहे. कळंबोली-चिंचपाडा मार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच दरम्यान, गव्हाणफाटा चिरनेर रोडवर सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह उरण पोलिसांना आढळून आला होता. नक्की मृतदेह कोणाचा आहे, हा पोलिसांनीही तपास सुरू केला होता. तपास सुरू असताना जेजुरी पोलिस ठाण्यात मायलेकीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली होती. मृत महिलेची आई मंदाकिनी सानप यांना शहर पोलिसांनी बोलावून घेतले,व दोन्ही मृतदेहाची ओळख पटली होती. या दुहेरी हत्याकांडाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. मृत महिलेचा पती पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. मात्र पनवेल शहर पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपले कसब पणाला लावले.व आपली ओळख लपवून गोव्यात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या आरोपीला शोधून काढण्याचे आव्हानात्मक काम केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश दळवी, पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलिस हवालदार बाबाजी थोरात, विजय आहिरे, पोलिस नाईक अजय वाघ, पंकज पवार, पोलिस शिपाई अनिल मानकर यांच्या मेहनतीमुळे सलग साडेतीन वर्ष आपली ओळख लपवून पत्नी व मुलीची हत्या करणारा गुन्हेगार गजाआड करण्यास यश आले आहे.

Byts
अशोक दूधे, परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.