ETV Bharat / state

काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी गेलेल्या पद्माकर जाधव यांचा मृतदेह सापडला - Padmakar Jadhav news

पुणे येथील पद्माकर तामजीराव जाधव हे पत्नी अपर्णा जाधव आणि दहा वर्षीय मुलगा पराग जाधव यांच्यासमवेत काशीद समुद्रकिनारी फिरण्यास आले होते. पद्माकर जाधव यांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले होते.

काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पद्माकर जाधव यांचा मृतदेह सापडला
author img

By

Published : Aug 16, 2019, 4:58 PM IST

रायगड - मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी पुण्यातील जाधव कुटुंब आले होते. त्यातील पद्माकर तामाजीराव जाधव हे पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र परत आलेच नाही. अखेर त्यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास काशीद समुद्र किनारी सापडला आहे.

काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पद्माकर जाधव यांचा मृतदेह सापडला

पुणे येथील पद्माकर तामजीराव जाधव हे पत्नी अपर्णा जाधव आणि दहा वर्षीय मुलगा पराग जाधव यांच्यासमवेत काशीद समुद्रकिनारी फिरण्यास आले होते. पद्माकर जाधव यांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले. पाण्यात बेपत्ता झाल्याने पत्नीने आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नव्हते. त्यातच रात्र झाली, त्यामुळे शोध मोहिमेस अडचण निर्माण झाली होती. अखेर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान काशीद समुद्र किनारी जाधव यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्यांना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याठी नेण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पर्यटक हे मौज मजा करण्यासाठी समुद्र किनारी येतात. मात्र, येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता असते. समुद्र किनारी दिलेल्या सूचनाकडे येणारे पर्यटक दुर्लक्ष करतात. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Intro:काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पद्माकर जाधव यांचा मृतदेह सापडला

मुरूड पोलीस आणि काशीद ग्रामस्थांच्या सहाय्याने शोध सुरू होता

रायगड : मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुप्रसिद्ध अशा काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेलेला पद्माकर तामाजीराव जाधव याचा मृतदेह रात्री साडे अकराच्या सुमारास काशीद समुद्र किनारी सापडला.Body:पुणे येथील पद्माकर तामजीराव जाधव हे पत्नी अपर्णा जाधव आणि दहा वर्षीय मुलगा पराग जाधव यांच्यासमवेत काशीद समुद्रकिनारी फिरण्यास आले होते. पद्माकर जाधव ह्यांना पोहण्याचा मोह न आवरता आल्याने ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात कुठेतरी बेपत्ता झाले होते. पाण्यात बेपत्ता झाल्याने पत्नीने आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. Conclusion:जाधव याचा शोध सुरू केला मात्र ते सापडले नव्हते. त्यातच काळोख पडण्यास सुरुवात झाली असल्याने शोध घेण्यास अडचण निर्माण झाली होती. अखेर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान काशीद समुद्र किनारी जाधव यांचा मृतदेह सापडला. मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याठी नेण्यात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पर्यटक हे मौज मजा करण्यासाठी समुद्र किनारी येतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्याने बुडण्याची शक्यता असते. समुद्र किनारी दिलेल्या सूचनाकडे येणारे पर्यटक दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे बुडणाऱ्याचा संख्येत वाढ होताना दिसत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.