ETV Bharat / state

महाडमध्ये चोरट्यांनी कांद्यावर मारला डल्ला

कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. महाडमध्ये एका व्यापाऱ्याच्या दोन पोते कांद्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे.

कांदा
author img

By

Published : Sep 25, 2019, 5:51 PM IST

रायगड - सोने, पैसे, चीजवस्तू, ऐवज चोरून नेल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र, महाडमध्ये चक्क सध्या सोन्याचा भाव आलेल्या कांद्याच्या दोन पोती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बटाटा व लसणाच्या गोणी असताना फक्त कांद्याच्याच पोती नेल्या आहेत. त्यामुळे कांदा विक्रेत्यांना कांद्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला

देशात सध्या कांदा हा सर्व सामान्यांसह श्रीमंतांनाही रडवत आहे. कांद्याचा भाव हा गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव 40 ते 45 रुपायांपर्यंत पोहोचले असून किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो विकला जात आहे. महाडमधील कांदा विकणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांची 2 कांद्याची पोती अज्ञात चोरट्याने चोरून दिवाळी साजरी केली आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकींसाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

जयेश शिरशिवकर महाड शहरातील लोखंडी पूल येथे किरकोळ कांदा, बटाटे, लसूण विकतो. दिवसभर व्यापार करून झाला की राहिलेला माल आपल्या छोट्याशा गाळ्यात ठेवतो. गाळा बंद करून जयेश रात्री घरी गेला. रात्री अज्ञात चोरट्याने जयेश यांचा गाळा फोडून गाळ्यातील फक्त कांद्याची दोन पोती चोरून नेली. जयेश दुकानात हा प्रकार दुसऱ्या दिवशी आल्यानंतर उघडकीस आला. चोरट्याने साधारण १५ हजारांचा माल चोरून नेल्याचे समजत आहे. देशात सध्या कांदा महागला असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा आता कांदा चोरीकडे वळवल्याचे दिसत आहे.

Intro:
महाड मध्ये चोरट्याने मारला कांद्यावर डल्ला

किरकोळ कांदा विक्रेत्याच्या गाळ्यातून नेल्या कांद्याच्या दोन पोती

रायगड : सोने, पैसे, चीजवस्तू, ऐवज चोरून नेल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र महाड मध्ये चक्क सध्या सोन्याचा भाव आलेल्या कांद्याच्या दोन पोती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बटाटा व लसूण याच्या गोणी असताना फक्त कांद्याच्याच पोती नेल्या आहेत. त्यामुळे कांदा विक्रेत्यांना कांद्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशात सध्या कांदा हा सर्व सामान्यांसह श्रीमंतांनाही रडवत आहे. कांद्याचा भाव हा गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला चाट बसला आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव 40 ते 45 रुपायांपर्यंत पोहचले असुन किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो विकला जात असताना महाड मधील करकोळ कांदा विकणाऱ्या व्यापाऱ्यांची दोन कांद्याची पोती अज्ञात चोरट्याने चोरून दिवाळी साजरी केली आहे.Body:महाड शहरातील लोखंडी पूल येथे किरकोळ कांदा, बटाटे लसूण विकणाऱ्या जयेश शिरशिवकर उन्हा, पावसाची पर्वा न करता कांदा, लसूण, बटाटे विक्री व्यवसाय करतो. दिवसभर धंदा करून झाला की राहिलेला माल आपल्या छोट्याशा गाळ्यात ठेवतो. गाळा बंद करून जयेश रात्री घरी गेला. रात्री अज्ञात चोरट्याने जयेश याचा गाळा फोडून गाळ्यातील फक्त कांद्याची दोन पोती चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी जयेश दुकानात आल्यानंतर उघडकीस आला. Conclusion:अज्ञात चोरट्याने साधारण पंधरा हजाराचा माल चोरून नेल्याचे समजत आहे. देशात सध्या कांदा महागला असल्याने चोरट्यानी आपला मोर्चा आता कांदा चोरीकडे वळवल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.