ETV Bharat / state

ओएनजीसीतील नोकरीपासून प्रकल्पग्रस्त वंचित; बेरोजगार संघटनेचे नोकर भरतीसाठी आंदोलन - ONGC Projected deprived for jobs; agitation of Unemployment union for recruitment

रायगड - जिल्ह्यातील उरण नागाव येथील प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार ओएनजीसीतील नोकरीपासून वंचित आहेत. या बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांच्या महत्वाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनीच्या गेट समोर उपोषण सुरु केले आहे.

Unemployment union agitation on ONGC for recruitment in raigad
ओएनजीसीतील नोकरीपासून प्रकल्पग्रस्त वंचित; बेरोजगार संघटनेचे नोकर भरतीसाठी आंदोलन
author img

By

Published : Jun 29, 2021, 10:36 AM IST

रायगड - जिल्ह्यातील उरण नागाव ओएनजीसी प्रकल्पामध्ये गेले काही वर्ष सातत्याने विविध कंत्राटाद्वारे नोकर भरती होत आहे. नागाव म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगारांना जाणून बुजून डावलले जात आहे. असा आरोप करत येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५०० एकर जमीन संपादित केली होती. प्रकल्प सुरु होऊन ४० वर्षे उलटली. मात्र आजही या गावातील सुशिक्षित बेरोजगार ओएनजीसीतील नोकरीपासून वंचित आहेत. या बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांच्या महत्वाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनीच्या गेट समोर उपोषण सुरु केले आहे.

गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही -

स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी नागाव म्हातवली येथील बेरोजगार संघटनेने बेमुदत आंदोलनला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचा तसेच बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळाला आहे. " नागाव म्हातवलीतील सर्व बेरोजगारांना ओएनजीसी कंपनीत (प्रकल्पात) काम मिळावे, ओएनजीसी कंपनीत, प्रकल्पात नागाव म्हातवलीतील बेरोजगारांना कॉन्ट्रॅक्ट मिळावे. अशी आमची प्रमुख मागणी असून जोपर्यंत याबाबतीत आम्हाला ओएनजीसी कंपनी प्रशासनाकडून लेखीपत्रक मिळत नाही. तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच पुढे सुरु ठेऊ. नोकरी दिल्या नाही तर थेट गेटमध्ये घुसू. आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. जर कोणाचे बरे वाईट झाले तर त्या परिणामास सर्वस्वी ओएनजीसी प्रशासनच जबाबदार राहील " असा आक्रमक इशारा नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे.

आंदोलन भूमिपुत्रांना न्याय मिळवून देईल का? याकडे लक्ष

द्रोणागिरी भवन, एपीयु गेट, ओएनजीसी गेट जवळ सुरु असलेल्या या बेमुदत आंदोलनाला राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, बेरोजगार तरुण, सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला असून, येथील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा. यासाठी सर्व स्थरातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर हे आंदोलन येथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा उरण ओएनजीसी अग्नितांडव : चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; चार जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.