ETV Bharat / state

पीएमसी बँकेनंतर पनवेलमध्ये आणखी एक अर्बन बँक डबघाईला - kirit somayya on karnala bank news

पनवेलमधील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे आढळल्याने ही बँक आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहे. कर्नाळा बँकेतील ग्राहकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी सतत खेटा घालूनही पैसे मिळत नाही. तर, अनेकांच्या फिक्स डिपॉझिटचे पैसे खातेदारांना बँक देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

आणखी एक अर्बन बँक डबघाईला
author img

By

Published : Oct 1, 2019, 10:12 AM IST

Updated : Oct 1, 2019, 12:44 PM IST

रायगड - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेनंतर आता आणखी एक अर्बन बँक बुडण्याच्या मार्गावर आहे. कर्नाळा बँकेतून खातेदारांना आणि ठेवीदारांना आपले पैसे मिळत नसल्याने सर्व ग्राहकांनी धसका घेतला आहे. पीएमसी बँकेप्रमाणेच कर्नाळा बँकेतील खातेदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतेच पनवेलमध्ये येऊन कर्नाळा बँकेच्या खातेदारांशी संवाद साधला.

पनवेलची कर्नाळा नागरी सहकारी बँक डबघाईला

पनवेलमधील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे आढळल्याने ही बँक आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहे. कर्नाळा बँकेतील ग्राहकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी सतत खेटा घालूनही पैसे मिळत नाही. तर, अनेकांच्या फिक्स डिपॉझिटचे पैसे खातेदारांना बँक देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे पीएमसी बँकेविरोधात कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट कर्नाळा बँकेच्या व्यवस्थापनाविरेधातही लक्ष घातले आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल
रायगड जिल्ह्यात डबघाईला आलेली ही पाचवी अर्बन बँक आहे. गोरेगाव अर्बन बँक, रोहा-अष्टमी, सिद्धि विनायक, पेण अर्बन बँक यासारख्या अर्बन बँकदेखील यापूर्वी बंद पडल्या आहेत. कर्नाळा बँकेतही आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी बँकेतील ठेवीदार आणि खातेदारांना पुढे येऊन बँकेविरोधात तक्रार देण्यासाठी सांगितले. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, असा ठाम विश्वासही यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - बँकाना तब्बल अकरा दिवस सरकारी सुट्ट्या, वेळेत उरकून घ्या कामे

पीएमसी बँकबद्दल पत्रकारांनी विचारले असता, पीएमसी बँक आणि माझा कसलाही संबंध नसल्याचे यावेळी सोमय्या यांनी सांगितले.

Intro:पनवेल

सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक अर्बन बँक बुडण्याच्या मार्गावर आहे. पनवेलमधील
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर व्यवहार झाल्याचं आढळुन आल्यानं ही बँक आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहे. कर्नाळा बँकेतील ग्राहकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी बँकेत सतत खेटा घालूनही पैसे मिळत नाहीत, तर अनेकांच्या फिक्स डिपॉझिटचे पैसे खातेदारांना बँक देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तर दुसरीकडे पीएमसी बँकेविरोधात कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट कर्नाळा बँकेच्या व्यवस्थापनाविराधातही लक्ष घातलंय. Body:या कर्नाळा बँकेतून खातेदारांना आणि ठेवीदारांना आपले पैसे मिळत नसल्याने सर्व ग्राहकांनी धसका घेतलाय. सोमय्या यांनी पनवेल येथे येऊन कर्नाळा बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. पीएमसी बँकेप्रमाणेच कर्नाळा बँकेतील खातेदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतच पनवेलमध्ये येऊन कर्नाळा बँकेच्या खातेदारांशी संवाद साधला.

रायगड जिल्ह्यात डबघाईला आलेली ही पाचवी अर्बन बँक आहे.गोरेगाव अर्बन बँक, रोहा-अष्टमी, सिध्दिविनायक, पेण अर्बन बँक यासारख्या अर्बन बँक देखील यापूर्वी बंद पडल्या आहेत. कर्नाळा बँकेतही आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी बँकेतील ठेवीदार आणि खातेदारांना पुढे येऊन बँकेविरोधात तक्रार देण्यासाठी सांगितलं. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, असा ठाम विश्वासही यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. Conclusion:पीएमसी बँक बद्दल पत्रकारांनी विचारलं असता, पीएमसी बँक आणि माझा कसलाही संबंध नसल्याचं यावेळी सोमय्या यांनी सांगितलं.
Last Updated : Oct 1, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.