ETV Bharat / state

अलिबागमधील चौल गावाला ३५० वर्ष जुन्या मंदिराची परंपरा, श्रावणात भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे अलिबागमधील चौल गावाचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे चौल ग्रामस्थ या ठिकाणी अनेक सण उत्साहात साजरे करतात. महाशिवरात्र, त्रिपुरा पौर्णिमा, गुडी पाडवा यावेळी मंदिराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. श्रावणात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

अलिबागमधील चौल गावाला ३५० वर्ष जुन्या मंदिराची परंपरा, श्रावणात भाविकांची गर्दी
author img

By

Published : Aug 19, 2019, 2:10 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्यातील चौलगाव हे मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी साडेतीनशे वर्षापासूनची पुरातन मंदिरे आहेत. श्री क्षेत्र रामेश्वर हे शंकराचे साडेतीनशे वर्ष पुरातन हेमाडपंथी प्रकारचे मंदिर चौलचे ग्रामदैवत आहे. मंदिराच्या शेजारी गणपती, विठ्ठल रखुमाई, हनुमान, आशापुरी ही मंदिरे आहेत. मंदिराच्या समोर सुंदर अशी पुष्करणी असून दीपमाळा आहेत. याठिकाणी स्थानिकासह पर्यटकही श्रावणात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.

अलिबागमधील चौल गावाला ३५० वर्ष जुन्या मंदिराची परंपरा, श्रावणात भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात शंकरची पिंड असून मंदिरासमोर नंदी बसलेला आहे. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी असून लाकडाचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरासमोर असलेली पुष्करणी १५० बाय १५० लांबी व रुंदीची असून 16 ते 18 फूट खोल आहे. या पुष्करणीत स्थानिक तरुण तरुणी पोहण्यास येता असतात.

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराचे वैशिष्ट्ये येथील कुंड आहे. अनेकांना कुंड काय हे माहीतच नाही. मंदिरात पर्जन्य, वायू व अग्नी ही कुंड आहेत. पर्जन्य व वायू ही कुंड मंदिराच्या आतील सभामंडपात आहेत, तर अग्नी कुंड हे विठ्ठल रखुमाई व गणपती यांच्यामध्ये आहे. अग्नी व वायू कुंड ही सध्या गाडली गेली असून त्यावर लादी बांधकाम केलेले आहे. पर्जन्य कुंड आतील गाभाऱ्यात भाविकांना दिसते. निसर्गात वायू, अग्नी, पाऊस याचे प्रमाण कमी झाल्यास ही कुंड उघडली जातात. पर्जन्य कुंड हे 1941 साली उघडल्याची नोंद मंदिरामध्ये आहे. वायू व अग्नी कुंड अद्याप उघडलेले नाही.

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे चौल ग्रामस्थ या ठिकाणी अनेक सण उत्साहात साजरे करतात. महाशिवरात्र, त्रिपुरा पौर्णिमा, गुडी पाडवा यावेळी मंदिराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. श्रावणात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात मराठी सिनेमाच्या शूटिंग होत असतात. पर्यटकही मोठ्या संख्येने श्री क्षेत्र रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात.

Intro:स्लग

चौल मधील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर साडेतीन वर्षाचे

पर्जन्य, वायू, अग्नी कुंड असणारे एकमेव मंदिर

श्रावण, त्रिपुरा पौर्णिमा, महाशिवरात्र सण केले जातात उत्साहात साजरे

अँकर : अलिबाग तालुक्यातील चौल गाव हे मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. साडेतीनशे पुरातन मंदिरे चौल मध्ये आहेत. श्री क्षेत्र रामेश्वर हे शंकराचे साडेतीनशे वर्ष पुरातन मंदिर चौलचे ग्रामदैवत आहे. हेमाडपंथी प्रकारचे हे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी गणपती, विठ्ठल रखुमाई, हनुमान, आशापुरी ही मंदिरे आहेत. मंदिराच्या समोर सुंदर अशी पुष्करणी असून दीपमाळा आहेत. श्री रामेश्वर मंदिर हे चौलची शान असून स्थानिकासह पर्यटकही श्रावणात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात शंकरची पिंड असून मंदिरासमोर नंदी बसलेला आहे. पिंडीचे दर्शन घेण्यासाठी ओल्या कपड्याने जावे लागते. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी असून लाकडाचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरासमोर असलेली पुष्करणी ही दीडशे बाय दीडशे लांबी व रुंदीची असून 16 ते 18 फूट खोल आहे. या पुष्करणीत स्थानिक तरुण तरुणी पोहण्यास येत असतात.

Body:विवो 1

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे कुंड. अनेकांना कुंड काय हे माहीतच नाही. मंदिरात पर्जन्य, वायू व अग्नी ही कुंड आहेत. पर्जन्य व वायू ही कुंड मंदिराच्या आतील सभामंडपात आहेत. तर अग्नी कुंड हे विठ्ठल रखुमाई व गणपती यांच्या मध्ये आहे. अग्नी व वायू कुंड ही सध्या गाडली गेली असून त्यावर लादी बांधकाम केलेले आहे. तर पर्जन्य कुंड आतील गाभाऱ्यात भाविकांना दिसते. निसर्गात वायू, अग्नी, पाऊस याचे प्रमाण कमी झाल्यास ही कुंड उघडली जातात. पर्जन्य कुंड हे 1941 साली उघडल्याची नोंद मंदिरामध्ये दिसत आहे. तर वायू व अग्नी कुंड अद्याप उघडलेले नाही.

Conclusion:फायनल विवो

श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे चौल ग्रामस्थ या ठिकाणी अनेक सण उत्साहात साजरे करतात. महाशिवरात्र, त्रिपुरा पौर्णिमा, गुडी पाडवा यावेळी मंदिराला यात्रेचे रूप प्राप्त झालेले असते. तर श्रावणात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात मराठी सिनेमाच्या शूटिंग होत असतात. तर पर्यटकही मोठ्या संख्येने श्री क्षेत्र रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.