ETV Bharat / technology

YouTube Shorts निर्मात्यांसाठी AI फीचर, AI च्या माध्यमातून गाणी करता येणार रीमिक्स - YOUTUBE SHORTS AI FEATURE

YouTube एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. या फीचरमुळं निर्मात्यांना शॉर्ट्ससाठी गाणी रीमिक्स करण्यासाठी AI चा वापर करता येणार आहे.

YouTube Shorts
YouTube Shorts (YouTube)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 15, 2024, 4:17 PM IST

हैदराबाद : YouTube नं Shorts निर्मात्यांसाठी एक नवीन आणि मजेदार टूल सादर केलं आहे. या नवीन टूलमुळं, निर्माते गाणी रीमिक्स करू शकतात. तसंच स्वत: चं 30-सेकंदाचं गाणं तयार करु शकता. हे गाण त्यांना व्हिडिओंमध्ये वापरता येणार आहे. हे वैशिष्ट्य YouTube च्या ड्रीम ट्रॅक प्रोग्रामचा भाग आहे. सध्या फक्त हे फीचर निवडक निर्मात्यांसाठी उपलब्ध आहे. जाणून घेऊया YouTube च्या नवीन फीचरबद्दल...

कसं करत काम? : यामध्ये तुम्ही सूचीमधून गाणी निवडू शकतात. तसंच गाणं कसं बदलायचं, ते AI ला सांगू शकतात. यानंतर, AI (artificial intelligence) नवीन गाण्याचं व्हर्जन तयार करेल. जी मूळ गाण्याची शैली टिकवून ठेवेल, परंतु तुमच्या कल्पना देखील यात समाविष्ट करु शकता. त्यानंतर YouTube वरील मूळ गाणं शॉर्ट्समध्ये AI च्या मदतीनं रिमिक्स केलं जाईल.

ड्रीम ट्रॅक म्हणजे काय? : ड्रीम ट्रॅक नोव्हेंबर 2023 मध्ये लॉंच करण्यात आलं होतं. Google च्या AI टीम, DeepMind द्वारे हे समर्थित आहे. सुरुवातीला, काही निवडक यूएस निर्मात्यांना सुप्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात तयार केलेलं AI गाणं वापरण्याची परवानगी दिली गेली होती. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि जॉन लीजेंड, चार्ली XCX आणि ट्रॉय सिवन यांसारख्या अनेक लोकप्रिय संगीतकारांच्या सहकार्यानं हे वैशिष्ट्य आलं होतं. गेल्या वर्षभरात, ते यूएसमधील सर्व निर्मात्यांसाठी उपलब्ध झालं आहे.

मेटा नवीन AI फीचरवर करतय काम : मेटा त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन एआय टूल्सवर काम करत आहे. अलीकडे, मेटानं इंस्टाग्रामसाठी एक नवीन आणि रोमांचक वैशिष्ट्यावर काम करण्यास सुरवात केलीय. या नवीन फीचरमुळं युजर्स AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचे प्रोफाइल पिक्चर तयार करू शकतील.

हे वाचलंत का :

  1. iPhone साठी गुगलंच जेमिनी ॲप लाँच, जेमिनी लाइव्हला देखील करतं सपोर्ट
  2. Kawasaki Ninja ZX4RR भारतात 9.42 लाखात लॉंच
  3. 4.4 सेकंदात 0 ते 100 mph पर्यंत वेग पकडणारी BMW M340i भारतात लॉंच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.