रायगड : मुंबई - पुणे महामार्गावर तेल घेऊन जाणार ऑईल टँकरमध्ये लिकेज झाल्याने तेल सांडून रस्ता झाला निसरडा झाला आहे. ही घटना खोपोली हद्दीतील बोरघाटात सायमाळ जवळ रात्री घडली. हा टँकर मुंबईकडून पुण्याकडे जात होता. रात्री तीन वाजेपर्यत आयआरबी यंत्रणेने दगडाची माती (स्टोन डस्ट) पसरवून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारा ऑइल टँकर खोपोली जवळ सायमाळा येथे आला असता ऑइल भरलेली टाकी लिकेज झाली. त्यातून महामार्गावर ऑइल गळती सुरू झाली. साधारण एक किलोमीटर पर्यत ही ऑइल गळती टँकरमधून झाली होती.
ही घटना कळल्यानंतर आयआरबी कर्मचाऱ्यांनी रात्रीच रस्त्यावरील ऑइल पडून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी दगडाची माती पसरवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र तोपर्यंत मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे वाहनांना प्रचंड प्रमाणात धोका निर्माण झाला होता.