ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट - raigad corona update

रायगडकरांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढू लागल्याने कोरोनावर मात करणे शक्य झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असले तरी कोरोना कमी होतोय यातच रायगडकरांना आनंदाची बाब आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Oct 10, 2020, 3:19 PM IST

रायगड - रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव काळानंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते. मात्र, गेल्या काही दिवसानंतर जिल्ह्यात कोरोना हा बॅकफूटवर येण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. रायगडकरांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढू लागल्याने कोरोनावर मात करणे शक्य झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असले तरी कोरोना कमी होतोय यातच रायगडकरांना आनंदाची बाब आहे.

डॉ. सुहास माने - जिल्हा शल्य चिकित्सक

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा साधारण एप्रिल - मेपासून सुरू झाला. त्यानंतर काही तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले होते. मात्र, हळूहळू संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाने गाठलेच. कोरोनावर अद्यापही लस निघाली नसली तरी आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित रुग्णाला कोरोनामुक्त करण्यासाठी झटत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले. रोज आठशे ते नऊशे कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले, तर मृत्यूच्याही प्रमाणात वाढ होऊ लागले. त्यामुळे रायगडात कोरोना पुन्हा पसरण्यास सुरुवात झाली.

गणेशोत्सवानंतर वाढू लागलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताणही वाढू लागला. रुग्ण संख्या वाढू लागल्याने बेडची उपलब्धता कमी पडू लागली. यासाठी अलिबाग येथे 100 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली. या मोहिमेचा रायगड जिल्ह्यात चांगला फायदा झाला असून, प्रशासनाने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर त्वरित उपचार करणे शक्य झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत कमालीची घट होऊ लागली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण हे काही प्रमाणात वाढलेले आहे.

नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली आहे. नागरिक स्वतः आरोग्याची काळजी घेत आहेत. नियम पाळत आहेत. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचाही कोरोना आटोक्यात आणण्यास फायदा झाला आहे. रायगडकरांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री पाळा. पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे. कोरोनावर लस निघत नाही तोपर्यत काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती

1 लाख 74 हजार 909 नागरिकांची कोविड 19 चाचणी केली आहे. आतापर्यत 49 हजार 637 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, 44 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. 1409 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 3469 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 32.3 एवढा आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3 टक्के आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.